|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » लग्नाच्या आमिषाने शाळकरी मुलीवर बलात्कार

लग्नाच्या आमिषाने शाळकरी मुलीवर बलात्कार 

प्रतिनिधी/ बेळगाव

लग्नाचे आमिष दाखवून एका शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून सध्या ती मुलगी गर्भवती आहे. या संबंधी माळमारुती पोलीस स्थानकात पोक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

माळमारुती पोलीस स्थानकात वंटमुरी कॉलनी येथील एका तरुणावर भा.दं.वि. 376 व कलम 6 पोक्सो कायदा 2012 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला असून शुक्रवारी रात्री पीडित शाळकरी मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणातील संशयित आरोपी फरार झाला आहे. मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी यांच्या मार्गदर्शनाखाली माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत. सहा ते सात महिन्यांपूर्वी ही घटना घडली आहे.