|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सोलापुरात लाखों जणांच्या यात्रा महोत्सवाला प्रारंभ

सोलापुरात लाखों जणांच्या यात्रा महोत्सवाला प्रारंभ 

प्रतिनिधी/ सोलापूर

‘बोला बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र, श्री सिद्धेश्वर महाराज की जय’ असा  जयघोष करित रविवारी श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगास तैलाभिषेकाचा मुख्य धार्मिक विधी झाला. बाळीवेस येथील हिरेहब्बू यांच्या वाडय़ातून निघालेली भव्य मिरवणूक दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास श्री सिध्देश्वर मंदिरात आली. त्यानंतर तैलाभिषेकाचा नयनरम्य सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. आणि सोलापुरात लाखोंच्या यात्रा महोत्सवाला प्रारंभ झाला.

  बाळीवेस येथील हिरेहब्बू यांच्या वाडय़ात रविवारी, सकाळी 8 वाजता मानकरी सोमशंकर देशमुख आणि हिरेहब्बू मंडळींच्या हस्ते पहिल्या दोन नंदीध्वजाची विधीवत पूजा करून मिरवणूकीस प्रारंभ झाला. पुढे मानाच्या 7 नंदीध्वजाची मिरवणूक 68 लिंगाच्या तैलाभिषेकास निघाली. यावेळी हर्र बोला हर्र…च्या जयघोषात भाविकांच्या भक्ती-भावांचा संगम दिसून आला. ज्यामध्ये तैलाभिषेकाच्या वेळी बाराबंदी पोशाखातील भक्तांची मांदियाळी नंदीध्वजासोबत दिसून आली. यावेळी महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्रप्रदेश मधील लाखो भाविक दाखल झाले होते. ज्यातून अखंड नऊशे वर्षाची परंपरा आजही पुढे भाविकांनी सुरू ठेवल्याचे दिसून आले. अवघे सोलापूर भक्तीमय झाल्याचे दिसून आले.

  पुढे दुपारी साडेबाराच्या दरम्यान श्री सिद्धेश्वर मंदिरात नंदीध्वज विसाव्यासाठी थांबले आणि पुन्हा 68 लिंगांना तैलाभिषेक करून रात्री उशिरा हिरेहब्बू वडय़ात परतले.

 

तैलाभिषेकाच्या वेळी यांची उपस्थिती

या यात्रेस भाविकांबरोबरच पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे, महापौर शोभा बनशेट्टी, सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, माजी आमदार दिलीप माने, विश्वनाथ चाकोते, राजशेखर शिवदारे, प्रकाश वाले, ऍड. मिलींद थोबडे, केदारनाथ उंबरजे, प्रताप चव्हाण, नगरसेवक आनंद चंदनशिवे आदींची उपस्थिती होती.