|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ..अखेर रत्नागिरी ‘हायटेक’ बसस्थानकाचे काम उद्यापासून

..अखेर रत्नागिरी ‘हायटेक’ बसस्थानकाचे काम उद्यापासून 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरी ‘हायटेक’ बसस्थानकाचा भूमिपूजन सोहळा गणेशोत्सवादरम्यान पार पडला. मात्र 5 महिने उलटले तरी बसस्थानकाचे काम करुन सुरु झाले नव्हते. मात्र आता या कामाला अखेर मुहूर्त मिळाला असून मंगळवार 14 जानेवारीपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे येथील रहाटाघरमधून एसटी वाहतूक सुरु राहणार आहे.

  गेल्या तीन-चार वर्षापासून रत्नागिरी ‘हायटेक’ बसस्थानकाचा शुभारंभ विविध कारणांनी रद्द झाला होता. मात्र यावर्षी हा प्रश्न परिवहन विभागाने मार्गी लावला असून लवकरच ‘हायटेक’ बसस्थानकाचे काम पूर्णत्वास जाणार आहे. मंगळवारपासून प्रत्यक्ष कामकाज सुरु होणार असल्याची माहिती रत्नागिरी विभागीय कार्यालयाने दिली.

15 जानेवारीपासून सर्व लांब पल्ला, मध्यम लांब पल्ला तसेच ग्रामीण वाहतुकीच्या फेऱया या रहाटाघर बसस्थानकातून सुटतील. जिह्यातील ग्रामीण मार्गावरील फेऱया या प्रवाशांच्या सोयीसाठी रहाटाघर बसस्थानक येथून सुटल्यावर जयस्तंभला वळसा घालून मध्यवर्ती बसस्थानकावरील रसवंतीगृहाच्या शेजारील बसस्थानकावरुन प्रवासी घेवून मार्गस्थ होणार असल्याची माहिती देण्यात आली.

शहरी बसफेऱयांमध्ये बदल नाही

शहरी बसफेऱयांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. या फेऱया पूर्वीप्रमाणेच शहर बसस्थानकातून सुटतील. पार्सल व्यवस्था रहाटाघर बसस्थानक येथून होणार आहेत. कामगार पास व संगणकीय आरक्षण या सोयी शहरी बसस्थानकामध्येच करण्यात आल्या आहेत.