|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » Top News » कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडे यांची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडे यांची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली 

ऑनलाईन टीम / मुंबई :

कोरेगाव भीमा परिसरात एक जानेवारी 2018 रोजी झालेल्या हिंसाचारप्रकरणी प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्याविरोधत पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने सोमवारी फेटाळली. पोलिस तपासात हस्तक्षेप करणार नसल्याचे मत कोर्टाने व्यक्त केले. मात्र, तेलतुंबडे यांना अटकेपासून चार आठवडय़ांचा अंतरिम दिलासा कोर्टाने दिला आहे.

शहरी नक्षलवादाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांच्याविरोधत फौजदारी गुन्हा रद्द दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी तेलतुंबडे यांनी सुप्रीम कोर्टात विशेष याचिका दाखल केली होती. यावर सोमवारी सुनावणी झाली. या गुन्हय़ाची व्याप्ती मोठी असल्याचे निरीक्षण पोलिसांनी कोर्टात नोंदवले. त्यामुळे आता गुन्हा रद्द करणे योग्य ठरणार नाही. तपासात आणखी माहिती उजेडात येत आहे, असेही पोलिसांनी कोर्टात सांग‍तिले. दरम्यान, कोरेगाव भीमामध्ये गेल्यावषी एक जानेवारीला झालेल्या हिंसाचार झाला होता. त्याचे संपूर्ण महाराष्ट्रासह  इतर राज्यात पडसाद उमटले होते.

Related posts: