|Sunday, January 20, 2019
You are here: Home » Top News » शिकारीसाठी आलेल्या बिबटय़ाची गायींकडून शिकार

शिकारीसाठी आलेल्या बिबटय़ाची गायींकडून शिकार 

ऑनलाईन टीम / अहमदनगर :

बिबटय़ाने गायीची अथवा मानवाची शिकार केल्याच्या घटना नेहमी घडत असतात. मात्र गायीच्या शिकारीसाठी आलेल्या बिबटय़ाला आपले प्राण गमावावे लागल्याची घटना समोर आली आहे. शिकारीसाठी गोठय़ात घुसलेल्या बिबटय़ाला 30 ते 35 गायींनी एकत्रित हल्ला करुन ठार केले. संगमनेर तालुक्मयातील उंबरी-बाळापूर येथील ही घटना आहे.

विशेष म्हणजे बिबटय़ावर गायींनी हल्ला केला त्यावेळी गोठय़ाबाहेर असलेल्या दुसऱया बिबटय़ाने तेथून धूम ठोकली. संगमनेरमध्ये या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. संगमनेर तालुक्मयातील उंबरी-बाळापूर शिवारातील कारवाडी परिसरातील उंबरकर वस्तीत सूर्यभान रावसाहेब उंबरकर यांचा गायींचा मुक्त गोठा आहे. त्यामध्ये 30 ते 35 जनावरे आहेत. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास या गोठ्यात एका बिबटय़ाने मागील बाजूने प्रवेश केला. त्यामुळे गायी सैरावैरा पळत सुटल्या. तसेच त्यांनी मोठमोठय़ाने हंबरडा फोडत, बिबटय़ाचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली. या आवाजाने उंबरकर कुटुंबियांनी गोठय़ाकडे धव घेतली. यावेळी त्यांना एक बिबटय़ा या गायींच्या पायाखाली तुडवला जात असल्याचे, तर दुसरा गोठय़ाबाहेर उभा असल्याचे दिसले. त्यांनी याबाबत तात्काळ वनविभागाला माहिती दिली. वनकर्मचारी घटनास्थळी पोहोचले, तेव्हा गायीच्या पायाखाली दीड वर्षाचा नर जातीचा बिबटय़ा मृत झाल्याचे आढळले. या बिबटय़ाच्या हल्लात एक वासरुही जखमी झाले आहे.

Related posts: