|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » एलाईट संस्थेच्या मिस इंडिया स्पर्धेसाठी म्हैसुरच्या अपुर्वाची निवड

एलाईट संस्थेच्या मिस इंडिया स्पर्धेसाठी म्हैसुरच्या अपुर्वाची निवड 

ऑनलाईन टीम / बेंगळूर :

बेंगळूर मध्ये प्रतिष्ठित असणाऱया एलाईट संस्थेच्या मिस इंडिया स्पर्धेत म्हैसुरच्या अपुर्वा जैन ही विजेती ठरली आहे. अपुर्वा ही म्हैसुर येथील मन्मराज कॉलेजच्या प्रा. एस. ए. कमलाजैन यांची कन्या आहे. डिप्लोमा इन इंटिरियर डीझाइन, डिप्लोमा इन सॉफ्टवेअर पर्यंतचे शिक्षण घेतलेली अपुर्वा ही यापुर्वी झालेल्या विविध सौदर्यवती स्पर्धेची विजेती ठरली आहे.

यापुर्वी तीने 2016 साली मिस साऊथ कर्नाटक, मिस कर्नाटक, मिस साऊथ, मिस फोटोग्राफीक 2017 आदी विविध पुरस्कार पटकाविले आहेत. तिला साहित्याची देखिल आवड असुन तिने अनेक कविता देखिल रचल्या आहेत. ‘मल्लीगे कवन’ या कवीता संग्रहाचे प्रकाशन देखिल झाले आहे.