|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शिवेंद्रसिंहराजेंनी घेतला कामकाजाचा आढावा

शिवेंद्रसिंहराजेंनी घेतला कामकाजाचा आढावा 

वार्ताहर/ केळघर

जावली पंचायत समिती सभापती खांदेपालट होऊन नुतन सभापती जयश्री गिरी यांनी प्रत्यक्षात सोमवारपासून कामकाजास सुरुवात केली. दरम्यान सोमवारी कामकाजाच्या पहिल्या दिवशी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पंचायत समितीस भेट देऊन विविध खात्यांतील कामकाजाचा आढावा घेतला. तसेच नुतन सभापती जयश्री गिरी यांना कामकाज करताना ताकद देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जयश्री गिरी यांचा सत्कार केला. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पंचायत समितीस भेट देऊन विविध खात्यांचा आढावा घेतला. यावेळी बांधकाम उपअभियंता कृष्णात निकम यांना भणंग ते केळघरपर्यंत रस्त्याला खड्डे पडलेत ते खड्डे तात्काळ भरा. आणि ते भरत असताना केळघरपासून हे खड्डे भरण्यास सुरुवात करण्याच्या सूचना देखील आमदारांनी यावेळी बांधकाम अधिकाऱयांना केल्या. तसेच इतर खात्यांचा देखील आढावा घेतला.

यावेळी माजी सभापती सुहास गिरी, पंचायत समिती सदस्य विजय सुतार, सेवा दल अध्यक्ष नामदेव धनावडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सकपाळ, मोहनराव कासुर्डे, संतोष शेलार, सयाजी कदम, सुनिल फरांदे, आनंदराव जुनघरे, सेवादल सदस्य अजित जाधव, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे आदी कार्यकर्ते व तालुक्यातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार

यावेळी सभापती जयश्री गिरी म्हणाल्या, पंचायत समितीचे कामकाज करताना सर्वांना विश्वासात घेऊन आपण कामकाज करणार असून पक्षाच्या नेत्यांनी दाखवलेला आपल्यावरील विश्वास आपण सार्थ करून दाखवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच डोंगरमाथ्यावरील गावांमधील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Related posts: