|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्याचे आवाहन

हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्याचे आवाहन 

प्रतिनिधी/ बेळगाव

येत्या गुरुवार दि. 17 जानेवारी रोजी सीमाबांधवांनी हुतात्मा दिनाचे गांभीर्याने आचरण करावे, असे आवाहन शहर म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले आहे. शहर म. ए. समितीचे उपाध्यक्ष टी. के. पाटील, सरचिटणीस किरण गावडे आदींसह इतर पदाधिकाऱयांनी हे आवाहन केले आहे.

हुतात्मा दिनी सकाळी 9 वाजता हुतात्मा चौक येथे हुतात्म्यांना अभिवादनप्रसंगी तसेच त्यानंतर निघणाऱया मूक फेरीत सर्व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे. तसेच म. ए. समितीचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, नगरसेवक-सेविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सीमालढय़ामध्ये हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. त्यांच्या त्यागाचे मोल मोठे आहे. त्याचे स्मरण ठेवून हुतात्म्यांना अभिवादन करणे प्रत्येक सीमाबांधवाचे आद्य कर्तव्य आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.