|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

शाकंभरी पौर्णिमेचे महात्म्य

बुध. 16 ते 22 जानेवारी 2019

कुणासाठी कितीही करा लोक आम्हाला अनुकूल नाहीत. समोर गोड बोलतात व मागून टोचून  बोलतात. हाती पैसा टिकत नाही, काही लोकांना आमचा उत्कर्ष सहन होत नाही, अज्ञाताकडून सतत काही ना काही अघोरी प्रकार सुरू असतात, मुलेबाळे ऐकत नाहीत, व्यसनांचा शिरकाव झालेला आहे,  त्यामुळे शांती नाही, संतती होत नाही अशा अनेकांच्या तक्रारी असतात. संकटे आल्यावर माणसाला देव आठवतो. पण चांगली परिस्थिती असते तेव्हाही देवाचे आभार  मानून त्याची पूजा केलीच पाहिजे, तरच देवाची कायम कृपा रहाते. येत्या 21 जानेवारीला शाकंभरी पौर्णिमा आहे. स्कंदपुराण, देवीभागवत, दुर्गासप्तशती यासह अनेक पुराणातून शाकंभरी देवीचे  माहात्म्य वर्णन केलेले आहे. अत्यंत शीघ्र फलदायिनी म्हणून ही देवी प्रसिद्ध आहे. अयोध्या, द्वारका, मथुरा, काशी, अवंतिका माया, कांची, पंढरपूर, करवीर, हंपी, विरुपाक्ष, सेतूबंध, तुळजापूर, कोल्हापूर, अंबाबाई, वणीची सप्तश्रृंगी, माहुरची रेणुकामाता अशी जी महत्त्वाची क्षेत्रे आहेत, त्यात शाकंभरी देवीचे बदामी हे स्थानही प्रसिद्ध आहे. वनातील देवी असल्याने तिला बनशंकरी असे म्हणतात. पण शाकंभरी हे तिचे खरे नाव आहे व बदामी बनशंकरी येथील मंदिराच्या महाद्वारावरही शाकंभरी  प्रसन्न असेच लिहिलेले आहे. या देवीचे माहात्म्य वर्णन करायला अनेक जन्म पुरणार नाहीत. तरीही लोकांना त्यांचे महत्त्व कळावे यासाठी या देवीच्या उपासनेने काय साध्य होऊ शकते, याची थोडक्मयात माहिती येथे दिलेली आहे. दुष्काळाचे सावट, अन्नान्न दशा असणे, आर्थिक अडचणी, पती पत्नीतील मतभेद, लग्नातील विघ्ने, तिथी वार, नक्षत्राने होणारे कुयोग, अमावास्या, वैधृती व्यतिपात, भद्रा यासह घराण्यातील पितृदोष, नोकरी व्यवसायातील त्रास व नुकसान, नोकरी मिळण्यातील अडचणी, गुप्त शत्रूची पीडा, शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य, वास्तुदोष यासह हजारो संकटावर शाकंभरी  देवीचे पूजन अत्यंत उपयोगी आहे. देवांचे दिव्य स्वरुप एकच असले तरी त्यांचे अवतार निरनिराळे असतात. जगाच्या कल्याणासाठी देवीने जे जे अवतार घेतले आहेत, त्यात शाकंभरी अवतार हा धनधान्य, समृद्धी, पैसा अडका, सुखसमाधान, नोकर व्यवसायातील बरकत लक्ष्मीची कृपा यासाठी अतिशय महत्त्वाचा अवतार मानला जातो. शाकंभरी अष्टकम, शाकंभरी मंगलारती, शाकंभरी पंचकर्म, शाकंभरी कवचम, शाकंभरी महात्म्य, शाकंभरी सहस्त्रनाम यापैकी जे स्तोत्र मिळेल ते वाचून देवीची कृपा संपादन करता येते. ही स्तोत्रे सहजासहजी उपलब्ध होत नाहीत, त्यासाठी दुर्गासप्तशती किंवा देवीमाहात्म्य वाचून तिची पूजा केली तरीही चालू शकते. आजकाल शिक्षण  असूनही नोकऱया मिळत नाहीत, लग्ने होत नाहीत, शत्रूंचा ससेमिरा, कटकारस्थान यांचा सतत त्रास सुरू असतो. त्यामुळे घरात शांती रहात नाही. त्यासाठी थोडे देवाधर्माचे अवश्य करावे. त्याचा कुठे ना कुठे फायदा नक्कीच होतो. सर्व जातीचे, सर्व पंथाचे लोक या देवीचे भक्त आहेत. कर्नाटकात बदामी बनशंकरी या नावाने ही देवी प्रसिद्ध आहे. अमावास्या व पौर्णिमा या दोन तिथी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे या शाकंभरी पौर्णिमेला घरातल्या घरातच देवीची शास्त्राsक्त पूजा करावी व  वर्षाभरात अनुभव पहावा. जशी श्रद्धा तसे फळ या न्यायाने कोणत्याही देवतेच्या पूजनाचे फळ मिळत असते.

मेष

या सप्ताहात अचानक कोठून ना कोठून पैसा हाती खेळू लागेल. वडिलार्जित इस्टेट असेल तर त्यात फायदा होईल. उच्चशिक्षण घेत असाल तर परदेशगमनाचा योग येईल. उद्योगव्यवसाय नीट जोमाने सुरू होईल. आर्थिक चणचण भासणार नाही पण खर्चावर नियंत्रण ठेवा. घरातील वातावरण शांत ठेवा. अचानक कामगार वर्गाचा त्रास जाणवेल. विद्यार्थ्यांनी जड विषयावर अधिक अभ्यास करण्याकडे भर द्यावा.


वृषभ

मित्र मैत्रीणीची संगत जपून करा. अचानक धार्मिक क्षेत्रे व स्थळे पाहण्याची इच्छा निर्माण होईल. अतिहट्टीपणा व अतिशहाणपणा यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. अपरिचित व्यक्तिवर अतिविश्वास ठेवू नका. स्वत:च्या कर्तबगारीमुळे आर्थिक उन्नती साधाल. या सप्ताहात विवाहासाठी घाईगडबड करू नका. सामाजिक क्षेत्रात मनासारखे यश. तसेच मानमरातब उत्तम मिळेल.


मिथुन

अचानक उद्भवलेल्या समस्या सहजपणे सोडवाल. त्यामुळे संकटाची तीव्रता कमी होईल. मौल्यवान वस्तू खरेदी करताना काळजी घ्या. या सप्ताहात आर्थिक आवक कमी जास्त होत राहील. नोकरीत, शेजारीपाजाऱयाशी वादविवाद, संघर्ष वाढू देऊ नका. त्यामुळे निष्कारण तुमची काही लोक बदनामी करण्याचा प्रयत्न करतील. काही महत्त्वाची कागदपत्रे नीट जपून ठेवा. अन्यथा गहाळ झाल्यास पुढे त्याचा  मानसिक त्रास होऊ शकेल.


कर्क

रेंगाळलेली कामे, कठीण वाटलेले प्रश्न या सप्ताहात हळूहळू सुटू लागतील. आतापर्यंत केलेल्या धार्मिक अनुष्ठानाची पुण्याई दिसू लागेल. नोकरीव्यवसायात मनासारख्या काही घटना घडत जातील. काही कोर्टकचेऱयांची कामे असल्यास तूर्तास पुढे ढकला. घरातील आनंदी वातावरण असल्यास तुमची कामे जोमाने होऊ लागतील. घरातील अथवा बाहेरील वयस्क व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.


सिंह

ष÷ातील रवि अचानक आरोग्याच्या तक्रारी निर्माण करील. पाठदुखी, अशक्तपणा व पोटाचे विकार निर्माण करील. त्यासाठी या सप्ताहात खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. उद्योग व्यवसाय मनासारखा चांगला चालेल. त्यामुळे आर्थिक स्थितीत हळूहळू जोमाची भर पडू लागेल. दुरावलेले नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याशी संबंध हळूहळू सुधारू लागतील. कुटुंबात आनंदाची वार्ता कानी ऐकू येईल. नोकरीच्या प्रयत्नात असाल तर सूर्योपासना करून पुढे जावे.


कन्या

अचानक प्रवासाचे बेत आखाल. आतापर्यंत अडलेली कामे संक्रांतीनंतर मार्गस्थ होऊ लागतील. पण कुठे अडलेले आहे याचा शोध लावा. सार्वजनिक कार्यात भाग घेताना सावधगिरी बाळगा. काही सरकारी कामे हळूहळू होऊ लागतील. या सप्ताहात हिरवे वस्त्र व पांढरे तिळ दान करावे व कुबेराचा एखादा मंत्र म्हणावा. त्यामुळे अडलेली कामे मार्गस्थ होतील. काही हितशत्रुंच्या कारवाया सुरू होतील पण त्याकडे लक्ष न देणे हे उत्तम ठरेल.


तुळ

या सप्ताहात शेजाऱयापाजाऱयांशी, मित्रमंडळी व नातेवाईक यांच्याशी चालता बोलता खबरदारी घ्या. नोकरीव्यवसायात व उद्योग व्यवसायात काही नको ते प्रश्न उद्भवतील. मनावर संयम राखून काही निर्णय घ्यावे लागतील. त्यासाठी शुक्रवारी पांढरे तिळ व दूध पिंपळास अर्पण करा. काही सरकारी कामात अडचणी उद्भवतील. काही उच्चअधिकाऱयांचे सहकार्य मिळून अडलेली कामे होऊ लागतील. या सप्ताहात रागावर व वाणीवर नियंत्रण ठेवा.


वृश्चिक

 या सप्ताहात नोकरीव्यवसायात इतरावर  आपला प्रभाव पाडू शकाल. त्यामुळे आपल्या कामाचे इतरांकडून कौतुक होईल. पण साडेसातीचा अजून प्रभाव असल्याने नोकरी व्यवसायात मनासारखे स्थैर्य राहणार नाही. या सप्ताहात भावंडासाठी व कुटुंबासाठी  काही खर्च करावा लागेल. काही मनात चाललेल्या नकारात्मक विचारामुळे उदासीनता निर्माण होईल. निष्काळजीपणाने खर्च वाढवत राहू नका.


धनु

सध्या नोकरी व्यवसायासाठी उधार उसनवार वाढवू नका, अन्यथा फसगत होण्याची शक्यता आहे. अचानक कोठे खर्च वाढत चालला आहे याचा अंदाज येणार नाही. कुटुंबामध्ये शुभवार्ता ऐकू येईल. कोणतेही काम कताना उतावळेपणा करू नका.  गाडी वगैरे चालविताना काळजी घ्या. निष्काळजीपणाने चालवू नका. नवीन ओळखी वाढून त्याचा लाभ आपणास होईल. उद्योग व्यवसायात लोकांनी कोणाच्या सांगण्यावरून किंवा मोहाने कोणतेही चुकीचे काम करू नका.


मकर

वैवाहिक जोडीदाराशी वादविवात वाढवू देऊ नका. काही कायद्याच्या बाबी सांभाळून करा. मकर संक्रांतीनंतर आर्थिक परिस्थितीला कलाटणी मिळेल. काहीही कारणाने वरचेवर प्रवास घडत राहील. नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर इंटरव्हय़ूसाठी बरीच तयारी करावी लागेल. उच्चअधिकाऱयांशी वाद घालू नका. जुनी येणी हळूहळू वसूल होऊ लागतील. कष्टमुळेच आवक धनवृद्धी होणार आहे. नातेवाईकांशी बोलता चालताना काळजी घ्या.


कुंभ

या सप्ताहात व्यसन व व्यसनी मित्रांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. देण्या घेण्यातून वादविवाद निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. कुटुंबातील एखाद्या व्यक्तिमुळे चिंता निर्माण होईल. प्रवासात काळजी घ्या. अचानक आर्थिक येणी वसूल होतील. जीवनसाथीच्या सहकार्याने जुन्या काही समस्यातून सुटका होईल. दुरावलेली नाती पुन्हा आपणास येऊन मिळतील. काही मित्रवर्गापासून सावध रहा. निष्कारण गैरसमज निर्माण होऊन धोका निर्माण होईल.


मीन

आर्थिक बाबतीत नवी दिशा दिसेल. मनाची स्थिती टिकून राहिल्यामुळे नौकेला योग्यमार्ग मिळेल. एखाद्या नवीन व्यवसायाची योजना आखाल. उद्योगव्यवसायात हळूहळू वृद्धि वाढेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. काही राजकीय नेत्याकडून सहकार्य मिळून महत्त्वाची कामे होऊ लागतील. नोकरदारांना वरि÷ांची मर्जी लाभेल. व्यवसायानिमित्त वरचेवर प्रवास घडेल. काही प्रसंगी घर बदलीचा योग येईल. जे काही महत्त्वाचे काम करणार असाल त्यात घाईगडबड करू नका.