|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » नियम मोडल्यास 90 दिवस लायसन्स रद्द

नियम मोडल्यास 90 दिवस लायसन्स रद्द 

प्रतिनिधी/ सातारा

सध्या वाहतूक व्यवस्थेचे तीन-तेरा झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यात अनेक वाहनधारक उद्दामपणे वाहन चालवताना दिसून येत आहेत. त्यात दारू प्राशन करून वाहन चालविणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, बेदरकपणे वाहन हाकणे, मालवाहू वाहनातून प्रवाशांची वाहतूक करणे आणि क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक या पाच प्रकारांपैकी कोणताही वाहतूक नियम मोडला तर संबधित वाहनचालकाचे लायसन सस्पेंड करून त्याला किमान 90 दिवस वाहन चालवता येणार नसल्याची माहिती तसेच कडक कारवाई करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी दिली.

  धायगुडे म्हणाले, वाहनधारकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्ते अपघात मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याबाबत सुप्रीम कोर्टाच्या रस्ता सुरक्षा समितीने गांभीर्याने दखल घेत वाहतूक पोलीस, आरटीओकडून नियम तोडणाऱया वाहनचालकांकडून दंड आकारण्यासोबतच लायसन्स सस्पेंड करण्याचे आदेश दिले आहेत. वाहतूक सुरक्षेचे नियम मोडणाऱया अनेक वाहन चालकांना दंड आकारून फारसा फरक पडत नसल्याने लक्षात आल्याने वाहनचालकांच्या रस्ते अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी या कारवाया सर्वत्रच सुरू आहेत. वाहतूक पोलिसांनी नियम तोडणाऱया वाहनचालकांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता सदर वाहनचालकांचा परवानाच निलंबित करण्यासाठी तो आरटीओकडे पाठवण्याची कार्यवाही करत असल्याचे दिसत आहे. यासोबतच हेल्मेटचा वापर न करणे, सीटबेल्ट न लावणे या बाबींचा अवलंब न केल्यास यासाठी देखील दंडात्मक कारवाई सुरू आहे….