|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सरकार गोवा संपविण्याचा तयारीत

सरकार गोवा संपविण्याचा तयारीत 

प्रतिनिधी/ पणजी

 हे सरकार गोवा संपविण्याचा तयारीत असून गोव्याचा निसर्ग, शेती भागायती बिल्डरांच्या घषात घातल्या जात आहे. गोव्याचा संरक्षणसाठी आम्ही सर्वांनी एकत्र येणे गरजेच आहे, अशी मागणी गोंयचो आवाज या संघटनेने  पत्रकार परिषदेत केली.

 राजकारण्यांनी गोवा विकायला काढला आहे सध्याचे सरकार हे पूर्णपणे कोलमडले असून प्रशासकीय काम ठप्प झाले आहे. आमदार मंत्री आपल्याला हवे तसे निर्णय घेत आहेत. शिक्षण आरोग्यक्षेत्र कोलमडले आहे बेरोजगारी वाढली आहे. पण सरकाचे याकडे काहीच लक्ष नाही. विकासाच्या नावाखाली गोव्याचा जमिनी हडप केल्या जात आहे. कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, असे या संघटनेचे संयोजक कॅ. विरियाटो फर्नांडिस यांनी सांगितले.

 गोव्यात मोठय़ा प्रमाणात प्रकल्प सुरु आहे. आता आयटी पार्क लादण्याचा प्रयत्न होत आहे. चिंबलचा पर्यावरणाकडे पूर्णपणे दुलर्क्ष करुन हा पार्क आणला जाता आहे. गोंय गोंयकारपण सांगणाऱया या सरकारला गोव्याविषयी काहीच पडलेले नाही. गोव्यात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार सरु आहे. प्रादेशिक आराखडा 2021 हा गोवेकराचा जमीन हपड करणारा आहे. सर्व जागा बिल्डरांचा घशात घातल्या जाणार आहे. गेंयचो आवाज संघटना याला विरोध करत असून वेळ पडल्यास गोवा संर्वधनासाठी  रस्त्यावर उतरणार आहे, असे या संघटनेतर्पे सांगण्यात आले.

 यावेळी स्वप्नेश शेर्लेकर, जुझे मिरांडा, सेल्सो फर्नांडिस, रोशन माथाईश व मनोज परब उपस्थित होते.