|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सुरेखा नाईक यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

सुरेखा नाईक यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान 

वार्ताहर/ माशेल

अंगणवाडी सेविका श्रीमती सुरेखा सुरेंद्र नाईक यांना राष्ट्रीय पातळीवरील अंगणवाडी सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. खडपवाडा कुंभारजुवे येथील अंगणवाडी क्र. 55 मध्ये त्या सेविका आहेत. वर्ष 2017-18 च्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली होती.

नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय महिला व बाल विकासमंत्री श्रीमती मनेका गांधी यांच्याहस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.

सुरेखा नाईक यांनी अंगणवाडी सेविका म्हणून आपली कामगिरी योग्यप्रकारे बजावताना केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या प्रचार व प्रसारासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गर्भवती महिलांसाठी आहार व पोषण तसेच लहान मुलांच्या आरोग्याविषयी पल्स पोलिओ, एमआरएम रुबेला, विटामीन ए आदी योजनांचा त्यात समावेश आहे. स्तनपान सप्ताह, आहार पोषण सप्ताह, महिला दिवस, विश्व आरोग्य दिवस असे उपक्रम आयोजित करून त्याचा लाभ महिलांना मिळवून दिलेला आहे. त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली.