|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » leadingnews » नऊ दिवसांनी अखेर बेस्टचा संप मिटला

नऊ दिवसांनी अखेर बेस्टचा संप मिटला 

ऑनलाईन टीम / मुंबई :

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर बेस्ट कर्मचाऱयांच्या संपाचा तिढा सुटला आहे. बेस्ट कर्मचाऱयांनी नऊ दिवसांनी अखेर आपला संप मागे घेतला आहे. थोडय़ाच वेळात संप मिटल्याची अधिकृत घोषणा कऱण्यात येणार आहे. वेतनवाढीबाबत उच्च न्यायालयाने बेस्ट प्रशासनाला निर्देश दिले आहेत. अंतिम तडजोडीसाठी सरकारला तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. जानेवारी 2019 पासून कामगारांना 10 टप्प्यातील वेतनवाढ लागू करण्याचेही प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत.

सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर उच्च न्यायालयाने कामगार संघटनेने तासाभरात बेस्टचा संप मिटल्याची घोषणा करावी असा आदेश दिला होता. यावेळी कामगार संघटनेने वेतनवाढ 10 ऐवजी 15 टप्प्यात हवी अशी मागणी केली होती. तसंच वाटाघाटींसाठी औद्योगिक क्षेत्राशी संबंधित त्रयस्थ व्यक्तीची नेमणूक करावी अशी मागणी केली होती. त्याशिवाय बेस्ट आणि पालिका प्रशासनासोबत बोलणी यशस्वी होणार नाही असं मत कामगार संघटनेने व्यक्त केले होते.