|Thursday, August 22, 2019
You are here: Home » उद्योग » पांढऱया रंगाच्या कार्सना सर्वाधिक पंसती

पांढऱया रंगाच्या कार्सना सर्वाधिक पंसती 

पेन्ट्स आणि कोटिंग कंपनी बीएएसएफच्या अहवालात माहिती सादर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशात कार खरेदी करणाऱया ग्राहकांचा सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे त्या गाडीचा रंग होय. कारण कोणताही ग्राहक रंगाला जादा पसंती देत असल्याचे मत निरीक्षणामधून नोंदवण्यात आले आहे. मागील वर्षात खरेदी करण्यात आलेल्या कार्सच्या प्रथम क्रमांकाचा रंग, दुसऱया क्रमांकाचा रंग अशी वर्गवारी करण्यात आल्यास त्यात पांढऱया रंगाला सर्वाधिक पसंती देण्यात आली आहे.

मागील वर्षात पांढऱया रंगाला सर्वाधिक पसंती दिली असून त्याची 43 टक्के निवड ग्राहकांनी केली आहे. त्या पाठोपाठ ग्रे आणि सिल्वर रंगाची ग्राहकांनी 15-15 टक्के निवड केली असल्याची नोंद पेन्ट्स आणि कोटीग कंपनी बीएएसएफ यांनी सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे.

सदर अहवालात स्पोर्टस यूटिलिटी वाहनांमध्ये (एसयूव्ही)च्या ग्राहकांमध्ये सर्वाधिक पांढऱया रंगाला पसंती मिळत असल्याची नोंद करण्यात आली आहे. यात 41 टक्के लोक पांढरा रंग निवडतात तर अन्य लोकांनी ग्रे, सिल्वर, लाल व निळा रंगाची निवड केल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

हवामानाचा परिणाम?

देशात मोत्यासारख्या पांढऱया रंगाला सर्वात जादा पसंती देण्याचे कारण मिस्त्र स्वरुपाचे हवामानाचा बदल होत असल्याचा अंदाज प्रभाव असल्याची शक्यता मांडण्यात आली आहे. कारण पांढऱया रंगाने वातावरणातील उष्णता नियंत्रणात  ठेवण्याचे कार्य होत असल्याचे मत बीएएसएफचे डिझायनिग प्रमुख चिहरु मत्सुहरा यांनी व्यक्त केले आहे.