|Saturday, August 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कन्हैया प्रभुनंद आखाडा परिषदेचे पहिले दलित महामंडलेश्वर

कन्हैया प्रभुनंद आखाडा परिषदेचे पहिले दलित महामंडलेश्वर 

घरवापसी’ची केली मागणी :

वृत्तसंस्था/ प्रयागराज

कन्हैया प्रभुनंद गिरि यांना अखिल भारतीय आखाडा परिषदेने पहिल्या दलित महामंडलेश्वर (आखाडय़ांच्या प्रमुखांपैकी एक) ही उपाधी प्रदान केली आहे. कन्हैया यांनी कुंभच्या पहिल्या दिनी संगमक्षेत्रात पवित्र स्नान केले आहे. शोषणाच्या भीतीने सनातन धर्म त्यागून बौद्ध, ख्रिश्चन किंवा मुस्लीम धर्म स्वीकारलेल्या दलित आणि मागास वर्गीयांनी ‘घरवापसी’ करावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. कन्हैया यांना मागील वर्षी परंपरेनुसार जूना आखाडय़ात सामील करण्यात आले होते. असमानतेपोटी इस्लाम, ख्रिश्चन आणि बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यांनी आता सनातन धर्मात परतावे असे मी इच्छितो. जूना आखाडय़ाने मला स्वतःमध्ये कशाप्रकारे सामील केलं आहे, हे मी त्यांना दाखवून देऊ इच्छितो. माझ्या पूर्ण जीवनात जातीय अपमान आणि शोषणाला तोंड दिले आहे. याच कारणापोटी हिंदू धर्म त्यागण्याचा मी निर्धार देखील केला होता असे कन्हैया यांनी सांगितले. शाहीस्नानासाठी रथावर बसविण्यात आले त्या क्षणाचे वर्णन करणे मला अवघड ठरले आहे. माझ्या अवतीभोवती भाविक ढोलाच्या तालावर नाचत होते, माझा समुदाय दीर्घकाळापासून अशा सन्मानापासून वंचित राहिला. नेते आणि प्रसारमाध्यमांनी दलित शब्दाचा वापर करू नये. आम्हाला घटनेद्वारे देण्यात आलेल्या नावांनी संबोधिले जावे असे कन्हैया यांनी म्हटले आहे.