|Saturday, August 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ‘हम दो, हमारे दो’साठी पाक न्यायालयाचे आवाहन

‘हम दो, हमारे दो’साठी पाक न्यायालयाचे आवाहन 

इस्लामाबाद

 पाकिस्तानात वाढत चाललेल्या लोकसंख्येला ‘टाईमबॉम्ब’ संबोधून तेथील सर्वोच्च न्यायालयाने धार्मिक विद्वान, नागरी संघटना तसेच सरकारला लोकसंख्या नियंत्रणाच्या उपाययोजनांना चालना देण्याचे आवाहन केले आहे. या उपाययोजनांमध्ये प्रत्येक कुटुंबात दोन मुलांच्या मर्यादेचा नियम देखील सामील आहे. &ंसरन्यायाधीश साकिब निसार यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय खंडपीठाने पाकिस्तानातील लोकसंख्या नियंत्रणविषयक याचिकेच्या सुनावणीदरम्यान हे आवाहन केले आहे.

पाकिस्तान जगातील पाचवा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. लोकसंख्या नियंत्रण योजनांच्या प्रचारासाठी पावले उचलण्याची सूचना न्यायालयाने विविध संस्थांना केली आहे.  लोकसंख्या नियंत्रणासाठीच्या योजनांसोबत पूर्ण देशाने उभे राहण्याची गरज असल्याची टिप्पणी सरन्यायाधीशांनी केली आहे.