|Thursday, August 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » वर्ल्ड बँक अध्यक्षपदासाठी इंद्रा नुयींचे नाव आघाडीवर

वर्ल्ड बँक अध्यक्षपदासाठी इंद्रा नुयींचे नाव आघाडीवर 

किम 1 फेब्रुवारी रोजी पदत्याग करणार

वृत्तसंस्था / न्यूयॉर्क

वर्ल्ड बँकेच्या (जागतिक बँक) अध्यक्षपदी ‘पेप्सीको’ कंपनीच्या माजी अध्यक्षा इंद्रा नुयी यांची नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ट्रम्प प्रशासनाशी मतभेद झाल्यामुळे जिम योंग किम यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे मागील महिन्यात स्पष्ट केले होते. आता अध्यक्ष निवडीत पसंतीच्या यादीत नुयी यांचे नाव आघाडीवर असल्याचे अमेरिकेतील ख्यातनाम ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ या दैनिकाने म्हटले आहे.

‘पेप्सीको’चे अध्यक्षपद भूषविलेल्या 63 वर्षीय नुयी यांचे डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. वर्ल्ड बँक अध्यक्षपद निवड समितीमध्ये ट्रम्प यांच्या कन्या इवांका ट्रम्प आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच इंद्रा नुयी यांच्यामध्ये वर्ल्ड बँकेच्या अध्यक्ष होण्याची शक्यता असल्याचे ट्विटरवर म्हटले होते. त्यांचीही नुयी यांना पसंती आहे. इंद्रा नुयी यांच्यासमवेत रे वॉशबर्न आणि डेव्हिड मॉलपास यांचीही नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. 1 फेब्रुवारीला विद्यमान अध्यक्ष जिम यॉन किम जबाबदारीतून मुक्त होणार आहेत. यानंतर नवीन अध्यक्षाच्या नावाची घोषणा होईल, असे द न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले आहे.