|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कुडासे येथे माकडतापाचा रुग्ण

कुडासे येथे माकडतापाचा रुग्ण 

वार्ताहर/ दोडामार्ग

गतवर्षी बांदा परिसरात रौद्र रुप धारण केलेल्या माकडताप आजाराने पुन्हा दोडामार्ग तालुक्यात डोके वर काढले आहे. तालुक्यातील कुडासे-वानोशी येथील अनिकेत रत्नकांत च्यारी (23) याला माकडतापाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. प्रथम दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात व नंतर त्याला म्हापसा (गोवा) येथील आजिलो रुग्णालयात हलविण्यात आले. माकडतापाचा रुग्ण आढळल्याने कुडासे व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

माकडतापाचा रुग्ण आढळल्यानंतर दोडामार्ग आरोग्य विभागाने तात्काळ कुडासे-वानोशी येथे धाव घेतली. रुग्ण आढळलेल्या घरात व आजुबाजूच्या परिसरात आरोग्य विभागाच्या पथकाने प्रतिबंधक मोहीम राबविली. कुडासेतील ग्रामस्थांनी माकडतापाबाबत हलगर्जीपणा न करता शेतकऱयांनी आरोग्य विभागामार्फत देण्यात आलेले डी. एम. पी. ऑईल अंगाला लावूनच जंगलात वा काजू बागेत जावे, असे आवाहन दोडामार्गचे वैद्यकीय अधिकारी डॉ. करस्तकर यांनी केले आहे.