|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सुधांशु कुलकर्णी पुरस्काराने सन्मानित

सुधांशु कुलकर्णी पुरस्काराने सन्मानित 

बेळगाव  / प्रतिनिधी

इंदूर येथील कै. पंडित बंडुभैया चौगुले स्मृती सन्मान समितीतर्फे बेळगावचे संवादिनी वादक डॉ. सुधांशु कुलकर्णी यांना बंडुभैय्या चौगुले सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. इंदूर येथील समारंभात मिलिंद महाजन यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी चौगुले कुटुंबियांतर्फे अनिता आणि अरुण चौगुले तसेच सुप्रसिद्ध गायिका कल्पना झोकरकर उपस्थित होत्या. त्यानंतर सुधांशु यांच्या संवादिनी वादनाने श्रेत्यांना खिळवून ठेवले..