|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रेल्वे ओव्हरब्रिच्या कामाचा दर्जा तपासा

रेल्वे ओव्हरब्रिच्या कामाचा दर्जा तपासा 

प्रतिनिधी/ बेळगाव

रावसाहेब गोगटे सर्कल येथील रेल्वेओव्हरब्रिजचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. मात्र केवळ 15 दिवसांतच या रेल्वेओव्हरब्रिजच्या भिंत्यांना तडे जावू लागले आहेत. याचबरोबर रस्ताही खराब झाला आहे. एकूणच या रेल्वे ओव्हरब्रिजचे काम  निकृष्ट झाले असून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

रेल्वेओव्हरब्रिज बांधकाम घाईगडबडीत केले आहे. कंत्राटदाराने सदर काम योग्य प्रकारे केले नाही. केवळ 15 दिवसांतच तडे गेल्यामुळे हे रेल्वेओव्हरब्रिज कधी कोसळेल, याची शाश्वती नाही. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. भाजपने 25 डिसेंबर रोजी उद्घाटन केले. पण त्या ओव्हरब्रिजबाबत कधीच त्यांनी कामाची पाहणी केली नाही. त्यामुळे कंत्राटदाराने मनमानीपणे काम केले आहे.

आठ दिवसांपूर्वी रेल्वेओव्हरब्रिजवरील डांबरी रस्त्यावरच मोठा खड्डा पडला. त्यानंतर तातडीने त्या खड्डय़ाची डागडुजी करण्यात आली आहे. केवळ 15 दिवसांत ही अवस्था झाली आहे. तर पावसाळय़ात हा ओव्हरब्रिज अबाधित राहणार काय? असा सवाल करण्यात आला आहे. शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुरेंद्र अनगोळकर, दुर्गेश मेत्री, सदानंद पाटील, नारायण बसर्गी, अमोल देसाई, गौतम कांबळे, शाम मंतेरो, कविता पतंगे, वनिता पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.