|Saturday, August 24, 2019
You are here: Home » leadingnews » थेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित

थेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्याने सरकार सुरक्षित 

ऑनलाईन टीम / लंडन :

ब्रेक्झिट ठराव संसदेत मंजूर करुन घेण्यात अपयशी ठरल्यानंतर पंतप्रधान थेरेसा मे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव थेरेसा यांनी जिंकला. मजूर पक्षाने थेरेसा मे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. या प्रस्तावाच्या बाजूने  306 सदस्यांनी मतदान केले. तर विरोधात 325 जणांनी मत नोंदवले. त्यामुळे मे यांच्या सरकारवरचे टळले आहे. मात्र ब्रेक्झिटचे नेमके  काय होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले  नाही. 

युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी पंतप्रधान थेरेसा मे यांनी मंगळवारी संसदेत प्रस्ताव आणला होता. त्यावर कनिष्ठ सभागृहात मतदान झाले. यात ब्रेक्झिट ठरावाविरोधात 432 सदस्यांनी कौल दिला. तर ब्रेक्झिटच्या बाजूने 202 सदस्यांनी मतदान केले. विशेष म्हणजे थेरेसा मे यांच्याच पक्षाचे 118 सदस्य विरोधात गेल्याने  पंतप्रधानांना मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे  लागले. यानंतर विरोधात असलेल्या मजूर पक्षाने  मे सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. यावर भारतीय वेळेनुसार बुधवारी रात्री उशिरा मतदान झाले. यामध्ये मे यांना 325 सदस्यांचा पाठिंबा मिळाला. तर 306 सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने  मतदान केले. त्यामुळे 19 मतांनी मे यांचे  सरकार वाचले.