|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया

जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया 

ऑनलाईन टीम / पुणे :

पुणे शहर पाणीटंचाईचा आणि कपातीचा सामना करत असतानाच आज शहरातील पर्वती जलशुद्धीकरण केंद्राचा व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. 

टाकीतून वाहणाऱ्या पाण्यामुळे पु. ल. टाकीतून वाहणाऱ्या पाण्यामुळे पु. ल. देशपांडे उद्यान, नवश्या मारुती या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने  महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून खडकवासला ते पर्वती दरम्यानच्या १६०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचा व्हॉल्व बंद करण्यात येत होता. त्याचवेळी हा बिघाड झाला.