|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » मुख्यमंत्री निवासस्थानी डान्सबारबाबत डील झाली : नवाब मलिक

मुख्यमंत्री निवासस्थानी डान्सबारबाबत डील झाली : नवाब मलिक 

ऑनलाईन टीम / मुंबई : 

मुख्यमंत्री निवासस्थानी डान्सबारबाबत डील झाली असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला.  दोन वर्षांपूर्वी भाजपचा वरिष्ठ नेता आणि डान्सबार मालक यांच्यात बैठक झाली आणि शायना एनसी आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मध्यस्थी केली होती आणि त्यामध्ये मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे सांगतानाच सर्वोच्च न्यायालयात सरकारने बाजू कमकुवत ठेवली असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

दरम्यान आमचे  सरकार आले  की पुन्हा डान्सबार बंदी आणणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.  डोंबिवली शस्त्रप्रकरणात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे आरोपीची पाठराखण करत असून मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे पोलिसांनी धनंजय कुलकर्णी यांचा रिमांड मागितला नाही असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.