|Thursday, February 27, 2020
You are here: Home » Top News » लडाखमध्ये हिमस्खलनामुळे तिघांचा मृत्यू

लडाखमध्ये हिमस्खलनामुळे तिघांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / लडाख :

जम्मू-काश्मीरच्या लडाखमध्ये मोठय़ प्रमाणात हिमस्खलन झाले आहे. अनेक वाहनांना याचा फटका बसला आहे. काही वाहनं बर्फाच्या खाली गेली आहेत. त्यामध्ये 10 जण अडकले होते. त्यातील तिघांचे मृतदेह हाती लागले असून 7 जणांचा शोध सुरू आहे.

हिमस्खलन झाल्याची माहिती मिळताच भारतीय लष्कराचे पथक तातडीने घटनास्थळा दाखल झाले. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. वातावरणात सतत बदल होत असल्याने लष्कराला अडचणींचा सामना करावा लागत आहे. लडाखसह संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये सध्या हिमवादळाने धुमाकूळ घातला आहे. आज सकाळी 7च्या सुमारास लडाखमधील खारदुंगलामध्ये रस्त्यावर बर्फाच्या डोंगराचा काही भाग कोसळला. याचा फटका पर्यटकांना बसला. खारदुंगला भागात जगातील सर्वात उंचीवर असणारा रस्ता आहे. या ठिकाणचे तापमान उणे 15 अंश सेल्सिअस आहे. या ठिकाणी बर्फाच्या डोंगराचा काही भास कोसळल्यानं काही पर्यटक अडकले आहेत. याशिवाय हिमवादळामुळेही काही जण अडकून पडले आहेत.

 

Related posts: