|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » धक्कादायक! फोनचा पासवर्ड सांगितला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले

धक्कादायक! फोनचा पासवर्ड सांगितला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले 

ऑनलाईन टीम / जकार्ता :

पती-पत्नीमध्ये रुसवे-फुगवे होतच असतात. पण अनेकदा छोट्या वादाचे रुपांतर मोठय़ा घटनांमध्ये होते. इंडोनेशियामध्ये अशीच एक घटना समोर आली, जी वाचून तुमच्याही अंगावर शहारा येईल. पतीने मोबाईल फोनचा पासवर्ड न दिल्याने एका महिलने त्याला जिवंत जाळले. डेडी पूरनामा असे पतीचे नाव असून तो 26 वर्षांचा होता.

 

इंडोनेशियाच्या वेस्ट नूसा टेंगाराच्या ईस्ट लोम्बाक रिजन्सीमध्ये ही घटना घडली. डेडी त्याच्या घराचं छप्पर दुरुस्त करत होता. त्यावेळी त्याची पत्नी इल्हाम चाहयानीने (वय 25 वर्ष) त्याच्या मोबाईल फोनचा पासवर्ड मागितला. पण डेडीने पासवर्ड देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. यावेळी डेडीने इल्हामला मारहाण केली. पण याचवेळी इल्हामने त्याच्यावर पेट्रोल टाकून त्याला जाळले. डेडी पूरनामा पूर्णतः भाजला आणि घटनेच्या दोन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, डेडी पूरनामा छतावरुन खाली उतरला आणि त्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केल्यानंतर वाद खूपच वाढला. यावेळी चाहयानीने पेट्रोलचं एक कॅन उचलले आणि पेट्रोल पतीवर फेकले. यानंतर लायटरने आग लावली. पूरनामाला केरुआक हेल्थ सेंटरमध्ये दाखल करण्यात आले, पण दोन दिवसांनी त्याने प्राण सोडले.