|Sunday, April 21, 2019
You are here: Home » Top News » शबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱया महिलांना सुरक्षा द्या :सुप्रिम कोर्ट

शबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱया महिलांना सुरक्षा द्या :सुप्रिम कोर्ट 

ऑनलाईन टीम / मुंबई :

सर्वोच्च न्यायालयाने केरळ सरकारला शबरीमला मंदिरात दोन जानेवारी रोजी प्रवेश करणाऱ्या दोन महिलांना पूर्णवेळा सुरक्षा प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने सुरक्षेव्यतीरिक्त अन्य मुद्यांमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला तसेच त्यांची याचिका फेरविचार याचिकेशी जोडण्याची त्यांची मागणी फेटाळून लावली.

 

आम्ही फक्त महिलांच्या सुरक्षेचा विचार करणार आहोत. अन्य मुद्यांचा नाही असे मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती एल.एन.राव आणि दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. फक्त दोनच नाही तर आणखी महिलांनी सुद्धा मंदिरात प्रवेश केला आहे हा केरळ सरकारने केलेला युक्तीवाद कोर्टाने विचारात घेतला नाही. 28 सप्टेंबरच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर 51 महिलांनी मंदिरात प्रवेश केला आहे असे केरळ सरकारच्या वकिलाने कोर्टाला सांगितले. उच्च न्यायालयाने नेमलेल्या मॉनिटरींग कमिटीविरोधतही युक्तीवाद ऐकण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

 

Related posts: