|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » Top News » अमरावतीत भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू ; तीन जखमी

अमरावतीत भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू ; तीन जखमी 

ऑनलाईन टीम / अमरावती :

अमरावतीमधील भातकुली तालुक्यात शाळेची भिंत कोसळल्याची घटना घडली असून यात आठवीत शिकणाऱया विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. भातकुली तालुक्यातील आष्टी गावात ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले आहेत.

 

भातकुली तालुक्यातील आष्टी येथे मणिबाई छगनलाल देसाई विद्यालय असून या विद्यालयाची भिंत दुपारी एकच्या सुमारास कोसळली. यात वैभव गावंडे (वय 13) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तो इयत्ता आठवीत शिकत होता. मणिबाई देसाई विद्यालयाची इमारत जुनी असल्याचे सांगितले जाते. जखमी विद्यार्थ्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने आष्टी येथे तणावाचे वातावरण पसरले आहे. आष्टी येथे आजूबाजूच्या गावांमधून अनेक विद्यार्थी शिकण्यासाठी येत असतात. जखमी विद्यार्थ्यांपैकी दोघे जण देवरी आणि अनकवाडी येथील आहेत.