|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » Top News » काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर शक्य : हरिश रावत

काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर शक्य : हरिश रावत 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे महासचिव हरीश रावत यांनी राम मंदिरासंदर्भात महत्त्वपूर्ण विधन केले आहे. देशात काँग्रेसचे सरकार आल्यावरच अयोध्येत राम मंदिर होणार, असे विधन त्यांनी केले आहे.

 

उत्तराखंडमधील पराभवानंतर काँग्रेसने पुन्हा एकदा या राज्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. या पार्श्वभूमीवर रावत हे उत्तराखंडचा दौरा करत असून रावत हे शुक्रवारी ऋषिकेश येथे पोहोचले. रावत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राम मंदिराच्या मुद्यावरुन भाजपावर टीका केली. रावत म्हणाले, मर्यादांचे उल्लंघन करणारे भाजपावाले हे पापी असून जे मर्यादा ओलांडतात ते मर्यादा पुरुषोत्तमाचे (प्रभू श्रीरामाचे) भक्त होऊच शकत नाही. आम्ही मर्यादेचे पालन करणारी लोक आहोत. काँग्रेस जेव्हा सत्तेवर येईल तेव्हा राम मंदिराचे निर्माण केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.