|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » Top News » गरज पडल्यास अध्यादेश काढू, पण डान्सबारवरील बंदी कायम ठेवू : मुनगंटीवार

गरज पडल्यास अध्यादेश काढू, पण डान्सबारवरील बंदी कायम ठेवू : मुनगंटीवार 

ऑनलाईन टीम / चंद्रपूर :

महाराष्ट्रातील डान्सबारबाबत गरज पडल्यास अध्यादेश काढू, पण बंदी कायम ठेवू, असे वक्तव्य राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. सुप्रीम कोर्टाने डान्सबारबाबत मोठा निर्णय देत राज्य सरकारचे अनेक नियम आणि अटी शिथिल केल्या आहेत. या निर्णयानंतर विरोधक सरकारवर कडाडून टीका करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार चंद्रपूरमध्ये बोलत होते.

‘डान्सबारच्या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करणार असून त्यासाठी विधी व न्याय विभागाची मदत घेऊ. आम्ही विधिमंडळात डान्सबार बंदीची सर्वपक्षीय भूमिका आधीच घेतली आहे. गरज पडल्यास अध्यादेश काढू, मात्र डान्सबार बंदी कायम ठेवू,’ असे मुनगंटीवार म्हणाले.

सुप्रीम कोर्टाने जरी बार सुरु करा सांगितले असले तरी पोलिसांना सूचना देऊन स्थानिक पातळीवर कायदे कठोर आणि नियम कडक केले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विरोधकांच्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले. जनतेचा आमच्यावर विश्वास आहे, विरोधक खोटारडे आरोप करत आहेत, असे ते म्हणाले. डान्सबारला आमचा विरोध असल्याचे सांगत कोर्टाची ऑर्डर हाती घेऊन पुढील भूमिका ठरवली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावर सुप्रीम कोर्टाची ऑर्डर हाती आल्यावर अधिक बोलणे योग्य राहिल. कोर्टाने जरी बार सुरु करा सांगितले असले तरी पोलिसांना सूचना देऊन स्थानिक पातळींवर कठोर कायदे नियम केले जातील, असे ते म्हणाले.