|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » leadingnews » ऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक विजय

ऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक विजय 

ऑनलाईन टीम / मेलबर्न :

भारताने मेलबर्न वनडेत ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारत ऐतिहासिक मालिकाविजयाला गवसणी घातली आहे. निर्णायक क्षणी महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधवने केलेल्या संयमी खेळीच्या जोरावर भारताने हा विजय साकारला.

महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा मॅच फिनिशरची भूमिका बजावली. युजवेंद्र चहलने रचलेल्या मजबूत पायावर धोनीने विजयी कळस चढवला. चहलने सहा विकेट घेतल्या. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात प्रथमच द्विदेशीय वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. फलंदाजांची कसोटी पाहणाऱया खेळपट्टीवर धोनीने एका बाजूने संयमी खेळ करताना भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाचे 231 धावांचे माफक लक्ष्य भारताने 7 विकेट राखून सहज पार केले. धोनीने नाबाद 87 धावा केल्या. कर्णधार विराट कोहली ( 46) आणि केदार जाधव ( नाबाद 61 ) यांनीही विजयात हातभार लावला. भारताने 49.2 षटकांत 3 बाद 234 धावा केल्या.तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 असा मालिकाविजय मिळवत ऑस्ट्रेलियात नवा इतिहास रचला आहे.