|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » उत्तर प्रदेशात सवर्णांसाठी 10 टक्के आरक्षणास मंजुरी

उत्तर प्रदेशात सवर्णांसाठी 10 टक्के आरक्षणास मंजुरी 

ऑनलाईन टीम / लखनौ :

उत्तर प्रदेश सरकारने राज्यात गरीब सवर्णांसाठी 10 टक्के आरक्षण लागू करण्यास मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने आर्थिकदृष्टय़ा मागास असलेल्या गरीब सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर केले होते. आर्थिकदृष्टय़ा मागासांकरीता आरक्षण लागू करणारे उत्तर प्रदेश हे देशातील सहावे राज्य ठरले आहे.

उत्तर प्रदेश सरकारने शुक्रवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेतला. राज्य सरकारचे प्रवक्ते आणि ऊर्जा मंत्री श्रीकांत शर्मा यांनी सांगितले, केंद्र सरकारने मंजूर केलेल्या आरक्षण कायद्याची उत्तर प्रदेश सरकार अंमलबजावणी करणार आहे. सर्व प्रकारच्या शासकीय सेवेतील नोकऱया आणि सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी आर्थिक दृष्टय़ा मागासांना आरक्षण देण्यात येणार आहे. हा कायदा लागू करण्यापूर्वी राज्यातील विधी, समाजकल्याण आणि अर्थ खात्याच्या अधिकाऱयांची बैठक झाली होती. या बैठकीत आरक्षण लागू करण्याबाबतच्या अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली होती. रीब सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्याबाबतचा निर्णय झाल्यानंतर गुजरात, तेलंगण, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आरक्षण लागू करण्यात आले आहे.