|Thursday, June 20, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » मोटोरोलाचा जुना फोन परत येतोय ; एवढी आहे किंमत

मोटोरोलाचा जुना फोन परत येतोय ; एवढी आहे किंमत 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मोटोरोला कंपनी प्रसिद्ध मोटोरोला रेजर हा फोन पुन्हा एकदा लाँच करण्याची तयारी करीत आहे. हा फोन एक फ्लपि फोन होता तो आता फोल्डेबल फोन म्हणून परत येणार आहे. या फोनची किंमत जवळपास 1 लाख रुपये इतकी असण्याची शक्यता ’द वॉल स्ट्रीट जनरल’च्या एका अहवालातून वर्तवण्यात आली आहे.

या फोनसाठी अमेरिकेची टेलिकॉम कंपनी व्हेरिझाँनशी चर्चा सुरू आहे. ही चर्चा यशस्वी झाल्यास आगामी फेब्रुवारीत हा फोन लाँच होण्याची शक्यता आहे. मोटोरोला रेजरची किंमत 1,500 डॉलर म्हणजेच 1 लाख 4 हजार 300 रुपये असू शकते. दरम्यान, मोटोरोलाने या फोनसंबंधी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मोटोरोला रेजर 2004 साली लाँच करण्यात आला होता. फ्लपि फोन असल्याने त्या काळी तो खूप महागडा मोबाइल म्हणून ओळखला जायचा. त्यावेळी हा फोन रेजर व्ही 3 या नावाने लाँच करण्यात आला होता. 2008 पर्यंत या फोनची विकी 130 मिलियनहून अधिक झाली होती, असे एका अहवालात म्हटले आहे.