|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » ‘अदानी’ 55 हजार कोटी रुपये गुजरातमध्ये गुंतवणार

‘अदानी’ 55 हजार कोटी रुपये गुजरातमध्ये गुंतवणार 

आगामी पाच वर्षात गुंतवणूक करण्याचे ध्येय

वृत्तसंस्था/ गांधीनगर

अदानी ग्रुपकडून आगामी पाच वर्षात अनेक नवीन योजना राबविण्यासाठी गुजरातमध्ये 55 हजार कोटीहून अधिक रुपयाची गुंतवणूक करण्याची घोषणा उद्योगपती गौतम अदानी यांनी शुक्रवारी केली आहे. या गुंतवणुकीच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प, सयंत्राची उभारणी, सिमेंट उद्योग आणि लिथियम बॅटरी निर्मिती करण्याचे सयंत्र उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी बोलताना  अदानी यांनी दिली.

अदानीकडून इतक्या मोठय़ा प्रमाणात घोषणा करण्यात आल्यावर येत्या पाच वर्षात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे 50 हजारहून अधिकची रोजगार निर्मिती होणार असल्याचा अंदाज या दरम्यान मांडण्यात आला आहे. त्याचा फायदा तरुणाईला रोजगार मिळवण्यासाठी होणार असल्याचा विश्वास कंपनीकडून व्यक्त करण्यात येतो आहे.

 गुंतवणुकीचा टक्का वधारणार

मागील पाच वर्षाच्या काळात कंपनीकडून 50 हजार कोटी रुपयाची गुंतवणूक कंपनीकडून करण्यात आलेली आहे. तर आता घोषणा करण्यात आल्याप्रमाणे आगामी काळात हा गुंतवणूकीचा टक्का वधारणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

अर्थव्यवस्थेला बळकटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात भारताची तयार केलेली उद्योग क्षेत्रांतील प्रतिमा आणखीन भक्कम करण्यासाठी नवीन उद्योगांची उभारणी करणे काळाची गरज असणार आहे. त्याच आधारे ही पावले टाकण्याचा प्रयत्न अदानी समूह करणार आहे. आणि भारताची उद्योग भरारी उंच झेपावणार असल्याचा विश्वास उद्योगपती गौतम अदानी यांनी यावेळी व्यक्त केला.