|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » दहा हजार कोटीहून जादा नफा कमाईसह रिलायन्स सर्वोच्च स्थानी

दहा हजार कोटीहून जादा नफा कमाईसह रिलायन्स सर्वोच्च स्थानी 

तिमाहीत विक्रमी नफा कमाई करण्यात आली नोंद : वर्षाला 9 टक्क्यांनी सरासरी नफ्याचे स्पष्टीकरण

वृत्तसंस्था/ मुंबई

रिलायन्स इंडस्ट्रीज या खासगी कंपनीला ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत 10 हजार 251 कोटी रुपयाचा विक्रमी नफा झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे. नफा कमाईचा दराचा आकडा लक्षात घेतल्यास वर्षाकाठी 8.8 टक्क्यांहून जादा नफा झाल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. कंपनीचा वाढता व्यवहारातील आलेख पाहता हा टप्पा उच्चांकी असल्याचा दावा उद्योगक्षेत्रातील तज्ञांकडून करण्यात येतो आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील खासगी क्षेत्रांत कार्यरत असणारी कंपनी असून  सलग 16 व्या तिमाहीत हीने नफ्याची विक्रमी नोंद करत आपली झेप कायम ठेवली आहे.

रिलायन्सच्या टेलिकॉम सेवा देण्यात 2017 पासून कार्यरत असणारी जिओने अन्य टेलिकॉम कंपन्यांना स्पर्धेत मागे टाकत आपला एक वेगळा ठसा निर्माण केला आहे. सलग तिमाहीत जिओची नफ्यातील घौडदौड कायम असल्याच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. तर दुसऱया बाजूला डिसेंबर 2018 तिमाहीत जिओकडून 2.79 कोटी नवीन ग्राहकांची जोडणी केली आहे. एपूण 31 डिसेंबर अखेर 28.01 कोटी इतक्या टप्प्यावर जिओची ग्राहक संख्या पोहोचली आहे.

रिटेल क्षेत्रात महसुलामध्ये 89 टक्क्यांनी वाढ

पेट्रोकेमिकल , रिटेल आणि डिजिटल सेवा या क्षेत्रांत समाधानकारक प्रदर्शनामुळे रिलायन्सच्या नफा कमाईत वधार झाल्याची नोंद केली आहे.

एकूण महसूलात 56 टक्क्यांनी वाढ

सन 2018 मध्ये ऑक्टोबर -डिसेंबर तिमाहीत रिलायन्सच्या महसुलात 1 लाख 71 हजार 336 कोटी रुपये महसूल कमाईचा विक्रम बनवला आहे. या वर्षात 55.9 हून अधिकच्या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. 2017 मध्ये ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत महसूलात 1 लाख 9 हजार 905 कोटी रुपये झाल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

जिओला सलग पाचव्या तिमाहीत नफा होत वर्षाकाठी 65 टक्क्यांनी वधार

रिलायन्सचा सर्वात जादा मार्केट कॅप असून तो 7.18 लाख कोटी रुपये आहे.

जिओला 831 कोटी रुपयाचा नफा

रिलायन्स जवळ 77 हजार 933 कोटी रुपये रोख रक्कम