|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » ‘बायजू’ कंपनीकडून ‘ओस्मो’ची 850 कोटीना खरेदी

‘बायजू’ कंपनीकडून ‘ओस्मो’ची 850 कोटीना खरेदी 

अमेरिकन कंपनीची करणार खरेदी :विदेशी व्यवसाय वाढीसाठी चालना

वृत्तसंस्था/ बेंगळूर

भारतीय कंपनी बायजूने अमेरिकेतील ओस्मो कंपनीची 850 कोटी रुपयाना खरेदी केली आहे. कंपनीचा उद्देश आहे, की आगामी काळात आपला व्यवसाय वृद्धीगत करण्यासाठीच हा निर्णय घेतला असल्याचे बायजूचे संस्थापक आणि सीईओ बायजू रविंद्रन यांनी म्हटले आहे. तर बायजूकडून तीन विदेशी गुंतवणूदारासोबत 3 हजार 890 केटी रुपये जोडण्याचा प्रयत्न केला आहे. तर या फंडासह कंपनीचे मूल्ये 25 हजार 920 कोटी रुपयासह देशातील पाचव्या क्रमांकाची स्टार्टअप बनली आहे.

भारताची ऑनलाईन एज्युकेशन स्टार्टअपमध्ये कार्यरत असणारी कंपनी म्हणून  बायजूची ओळख आहे. तीने अमेरिकेत कार्यरत असणारी ओस्मो संस्थेची 850 कोटी रुपयाना(12 कोटी डॉलर्स) मध्ये खरेदी केली आहे. 2015 मध्ये बायजूने सुरुवात केली होती. एका ऍपच्या आधारे तिसरी ते 12 पर्यंत शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना शिक्षणा संदर्भात सेवा देण्यात कार्यरत आहे. तर  ओस्मो ही संस्था मुलांना  खेळ शिकवण्यासाठी आवश्यक असणाऱया योजनांची निर्मिती करत असते. आणि त्याच्या माध्यमातून मुलांना डिजिटल यंत्रणेचा वापर करत खेळांना जोडण्याचा प्रयत्न ही संस्था करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ओस्मोच्या टीममध्ये कोणताही बदल नाही

ओस्मो स्वतंत्र बॅण्ड राहणार आहे. तर बायजू त्याची फिजिकल-टू-डिजिटल टेक्नालॉजी आणि त्यातील आश्याचा वापर करुन घेणार आहे. तर ओस्मो आणि सह संस्थापक प्रमोद शर्मा आणि त्यांची टीम काम करणार आहे.

विश्वास व्यवसाय वृद्धीचा

आगामी काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली व्यवसायाची योजना मजबूत करणार आहे. आणि यातून विस्तार करत भविष्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणार असल्याचा विश्वास बायजू यांनी व्यक्त केला.

टॉपचे 5 स्टार्टअप

स्टार्टअप   मूल्ये

फ्लिपकार्ट 1.58 लाख कोटी

पेटीएम…. 1.15 लाख कोटी

ओयो रुम्स 36,000 कोटी

ओला……. 28,800 कोटी

बायजू    25,920 कोटी