|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » विप्रोचा निव्वळ नफा 31.80 टक्क्यांनी वधारला

विप्रोचा निव्वळ नफा 31.80 टक्क्यांनी वधारला 

वृत्तसंस्था/ बेंगळूर

देशातील तिसऱया क्रमांकाची सर्वात मोठी, आयटी क्षेत्रात कार्यरत असणाऱया कंपनी -विप्रोला डिसेंबर 2018 तिमाहीमध्ये 2 हजार 544.5 कोटी रुपयाचा नफा  झाला अशी नोंद करण्यात आली आहे. ही तुलना डिसेंबर 2017 च्या तिमाहीशी करण्यात आल्यास या तिमाहीत 31.8 टवक्यांनी वाढ झाली आहे.

विप्रोने तिमाहीत झालेल्या नफा कमाईमुळे कंपनीच्या शेअरधारकांना 3 शेअर वरती एक बोनस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर त्यासोबतच 1 रुपये प्रति शेअर डिव्हीडंड देणार असल्याची घोषणा यावेळी केली. त्यासाठीची तारीख 30 जानेवारी निश्चित करण्यात आली आहे.