|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » टोयोटाची ‘कॅमरी हायब्रिड’ बाजारात

टोयोटाची ‘कॅमरी हायब्रिड’ बाजारात 

आठवी आवृत्ती 2019 भारतात सादर : एक्स शोरुम किंमत 36.95 लाख रुपये

नवी दिल्ली

 भारतात शुक्रवारी टायोटा कॅमरी हायब्रिडचे सादरीकरण करण्यात आले आहे. न्यू टेन्गा -के(टोयोटा न्यू ग्लोबल आर्किटेक्चर) या व्यासपीठावरुन ही अत्याधुनिक  पद्धतीने तयार करण्यात आलेल्या कारला दाखल केले आहे.  या कारमध्ये फ्यू एफिशिएन्सी आणि सुपिरियर ड्रायव्हींग करता येणार असून या गाडीची एक्स शोरुम 36.95 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

वेगळेपण

न्यू कॅमरी कार सर्वात लांब आणि रुंद आकाराची तयार करण्यात आली आहे. त्यांच्या चाकाचा बेस जुन्या मॉडेलपेक्षा 50 एमएमहून मोठा करण्यात आला असल्याची नोंद करण्यात आली आहे.

ड्रायव्हर सीटच्या शेजारी पॉवर नियंत्रणात ठेवण्यासाठी रिमोट हॅन्डलची निर्मिती करण्यात आली आहे.

नऊ एअर बॅग, एबीएस आणि इबीडी  क्षमता असणारी ब्रेक नियंत्रण असणारी सोय देण्यात आली आहे. तर कॅमेरा आणि सेन्सरयुक्त सुविधाही यामध्ये देण्यात आली आहे.