|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » Top News » अर्धनग्न मोर्चेकरी शेतकऱयांना मुंबईच्या वेशीवर अडवले

अर्धनग्न मोर्चेकरी शेतकऱयांना मुंबईच्या वेशीवर अडवले 

ऑनलाईन टीम / मुंबई :

साताऱयातील खंडाळा गावातून अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढणाऱया शेतकऱयांना मुंबईत अडवण्यात आले आहे. मानखुर्द इथं पोलिसांनी हा मोर्चा अडवला. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून जमिनी संपादित करताना प्रकल्पग्रस्त शेतकऱयांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप या शेतकऱयांनी केला आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर जलसमाधी घेऊ, अन् मंत्रालयात नग्न होवून घुसू, असा इशारा आंदोलक शेतकऱयांनी दिला आहे. सातारा जिह्यातील खंडाळा तालुक्मयातील शेतकऱयांनी खंडाळा तहसील कार्यालय ते मंत्रालय असा अर्ध नग्न मोर्चा काढला आहे.

मागील 10 वर्षांपासून या भूसंपादनाला शेतकरी विरोध करत आहेत. काल हा मोर्चा नवी मुंबईत धडकला होता. आज मुंबईकडे आगेकूच करताना मात्र त्यांचे म्हणणे ऐकण्याऐवजी पोलिसांनी त्यांचा मोर्चाच अडवला. सकाळी हा मोर्चा वाशीचा खाडी पूल ओलांडून मानखुर्दच्या बाजूला पोहोचला असताना मुंबई पोलिसांनी मोर्चा अडवला. यावेळी मोर्चेकऱयांना पोलिसांनी वाहतूक कोंडीचे कारण दिले आहे. दरम्यान सकाळपासून पोटात अन्नाचा कणही नसलेल्या या मोर्चेकऱयांना अखेर दुपारी त्यांच्याच गावातल्या बांधवांनी जेवण बनवूण आणून दिले. पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी मोर्चेकरी शेतकऱयांशी चर्चा केली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एमआयडीसीकडून जमिनी संपादित करताना प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल करुन फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱयांनी केला आहे. सातारा जिह्यातल्या धनगरवाडी, केसुर्डी, शिवाजीनगर, खंडाळा, बावडा, मोर्वे, भादे, अहिरे गावातील शेतकरी खंडाळय़ाहून अर्धनग्नावस्थेत पायी चालत आले आहेत.