|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News »  पंजाबमधील सर्वच जागा ‘आप’लढवणार – अरविंद केजरीवाल

 पंजाबमधील सर्वच जागा ‘आप’लढवणार – अरविंद केजरीवाल 

ऑनलाईन टीम / चंदीगड :

आगामी लोकसभा निवडणुकीत पंजाबमधील एकूण 13 जागांवर आम आदमी पार्टी (आप) लढवणार असल्याचे पार्टीचे राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी सांगितले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बरनावाला शहरात आम आदमी पार्टीच्या निवडणूक अभियानाला सुरुवात झाली. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी येथील संगरुरमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले, लोकांना बदल हवा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला लोक कंटाळले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव निश्चित आहे. यासोबतच अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील काही वरि÷ नेत्यांशी चर्चा केली. दरम्यान, आम आदमी पार्टीने पंजाबमधील लोकसभा जागांसाठी पाच उमेदवारांनी नावे गेल्या ऑक्टोबरमध्ये जाहीर केली होती. यामध्ये संगरुर, फरीदकोट, होशियारपूर, अमृतसर आणि आनंदपूर साहिब या मतदारसंघांचा समावेश आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे खासदार धरमवीरा गांधी आणि हरिंदर खालसा यांच्या 2015 मध्ये पार्टीतून निलंबित करण्यात आले होते. त्यांना आगामी लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली नाही आहे. तसेच, त्यांचे निलंबन मागे सुद्धा घेतले नाही. आम आदमी पार्टीने मागील 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंजाबमध्ये चार जागा जिंकल्या होत्या.