|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » संपूर्ण विश्वात उद्योगाची संधी शोधा!

संपूर्ण विश्वात उद्योगाची संधी शोधा! 

कुडाळ येथे सावंतवाडी संस्थान मराठा समाजाचे स्नेहसंमेलन उत्साहात : विद्यार्थ्यांचा गुणगौरव : समाजगौरव पुरस्कार प्रदान

वार्ताहर / कुडाळ:

आधुनिक तंत्रज्ञानामुळे भविष्यात नोकरीच्या संधी कमी झाल्या आहेत. त्यामुळे केवळ सिंधुदुर्गात मर्यादित राहता संपूर्ण विश्वात उद्योगाची संधी शोधा, असे आवाहन सावंतवाडी संस्थान मराठा समाज (मुंबई) संस्थेचे अध्यक्ष इंद्रजीत सावंत यांनी कुडाळ येथे केले.

सावंतवाडी संस्थान मराठा समाज (मुंबई) या संस्थेचे 24 वे जिल्हा स्नेहसंमेलन विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम येथील कै. पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज स्मारक सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

इंद्रजीत सावंत म्हणाले, या संस्थेच्या कुडाळ सावंतवाडी येथील जागेत व्यावसायिक शिक्षणाचा विशेषत: समुद्रामध्ये जे व्यवसाय चालतात, त्याला आवश्यक शिक्षण देण्याच्या दृष्टीने आम्ही पाऊल टाकणार आहोत.

जि. . माजी अध्यक्षा रेश्मा सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, कार्याध्यक्ष वसंत पारधी, सरचिटणीस शशिकांत गावडे, स्वागताध्यक्ष रामचंद्र परब, संस्था पदाधिकारी ऍड. हनुमान सावंत, रेखा राऊळ, विठ्ठल नाईक, एल. के. वारंग, नंदकिशोर गावडे, सुरेश गवस, माजी आमदार पुष्पसेन सावंत, मराठा समाजाचे जिल्हा समन्वयक ऍड. सुहास सावंत, शिक्षणप्रेमी अच्युत सावंतभोसले, उद्योजक संतोष कदम, नगरसेविका संध्या तेरसे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज शाळा सुधार पुरस्कार कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे येथील शोषित मुक्ती अभियान संस्थेला प्रदान करण्यात आला. ऍड. सुहास सावंत (सकल मराठा समन्वयक), रामचंद्र परब (सामाजिक शैक्षणिक कार्यकर्ते), सुशांत नाईक शंकर सावंत (सिंधु शेतीनिष्ठ पुरस्कार), अनुराधा सावंत स्नेहा गावडे (जि. . आदर्श शिक्षक पुरस्कार) या सर्वांनासमाजगौरवपुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

मराठा समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणारे लवू सावंत (कुडाळउद्योग), मुख्याध्यापक विवेकानंद बालम (कुडाळशिक्षण), चंद्रकांत सावंत (सावंतवाडीöशिक्षण), समीर राऊत (काळसेक्रीडा), साबाजी सावंत (कुडाळउद्योग), प्रेमलता सावंत (कुडाळसामाजिक), रमाकांत परब (तळवडेशेती), आत्माराम राणे (पणदूरöकृषी पर्यटन), कोमल परब (कुडाळशिक्षण), तानाजी सावंत (मुळदेकृषी), मृणाल सावंत (पिंगुळीनृत्यकला) तसेच बाळकृष्ण परब (कुडाळöराजपत्रित अधिकारी) यांचाही सत्कार करण्यात आला.

सतेश सावंत म्हणाले, आपल्या गरिबीचा बाऊ करता स्वावलंबी बनण्याइतके शिक्षण घ्या. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. गरीब मुलांच्या शिक्षणासाठी सिंधुदुर्ग बँकेने कमीतकमी व्याजाने कर्जपुरवठा करण्याचे ठरविले आहे. मराठा समाजातील धनवान लोकांनीही या कार्यास हातभार लावावा. रेश्मा सावंत यांनी विद्यार्थ्यांना व्यावसायिक क्षेत्राची कास धरण्याचे आवाहन केले.

प्रास्ताविक प्रभाकर परब, अहवाल वाचन कार्याध्यक्ष वसंत परब, सूत्रसंचालन डॉ. दीपाली काजरेकर, तर आभार संतोष कदम यांनी मानले. विविध परीक्षांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.