|Saturday, August 24, 2019
You are here: Home » क्रिडा » पाकच्या हॉकी संघाची घोषणा

पाकच्या हॉकी संघाची घोषणा 

वृत्तसंस्था/ कराची

पुढील महिन्यात सुरू होणाऱया आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो लीग सिरीज हॉकी स्पर्धेसाठी पाक संघाची रविवारी येथे घोषणा करण्यात आली. भारतात झालेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत सहभागी झालेल्या पाक संघातील कर्णधार मोहम्मद रिझवानसह अन्य 11 खेळाडूंना वगळण्याचा निर्णय पाकच्या हॉकी निवड समितीने घेतला आहे.

या स्पर्धेसाठी पाकच्या हॉकी संघात नवोदित खेळाडूंना अधिक संधी दिली आहे. इस्लामाबादमध्ये झालेल्या निवड चाचणीनंतर पाक निवड समिती प्रमुख इस्लाउद्दीन सिद्दक्की यांनी कर्णधार मोहम्मद रिझवान (सिनियर) आणि अन्य दहा हॉकीपटूंना वगळले. प्रो लीग सिरीज हॉकी स्पर्धेसाठी अली शानकडे पाक संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. 25 वर्षीय अली शानने आतापर्यंत 135 आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकचे प्रतिनिधीत्व केले आहे. प्रो लीग सिरीज हॉकी स्पर्धा अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युरोपियन देशांमध्ये आगामी सहा महिन्यांच्या कालावधीत खेळविली जात आहे. भारतामध्ये झालेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत पाक संघाला एकही सामना जिंकता आला नाही तसेच त्यांना या स्पर्धेत 11 व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

प्रो लीग हॉकी स्पर्धेसाठी मझहर अब्बास, इरफान सिनियर, मोहम्मद तौसिक अर्षद, रशीद मेहमूद, अझाज अहमद, अमाद शकील बट्ट, इरफान ज्युनियर, रिझवान सिनियर, टी. अब्बास, उमर भुट्टा आणि मोहम्मद झुबेर यांना वगळण्यात आले आहे. वकार अहमद, अमजद अली, रिझवान अली, अमजद अली खान, मोईन शकील, अझफर याकूब, राणा वाहिद, अकमल हुसेन आणि अतिक अर्षद या नवोदितांचा संघात समावेश राहील.

पाक संघ- वकार अहमद, अमजद अली, अलीम बिलाल, मुबाशर अली, रिझवान अली, अमजद अली खान, अबू बाकर मेहमूद, मोईन शकील, अझफर याकूब, अली शान (कर्णधार), फैझल कादीर, अतिफ मुश्ताक, अतिक अर्षद, राणा वाहिद, जुनेद मंझूर, गझनफर अली, अली अझीझ आणि शान इर्षाद.