|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » युवकांनी साने गुरूजींची प्रेरणा घ्यावी

युवकांनी साने गुरूजींची प्रेरणा घ्यावी 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

साने गुरूजींनी लहानपानापासूनच विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे दिले आहेत. या धडय़ांचा संग्रह म्हणून श्यामची आई हा पुस्तकरूपी ठेवा जपला आहे. त्याचा अभ्यास करून आजच्या युवकांनी साने गुरूजींच्या आदर्शाची प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन सानेगुरूजी कथामालेचे राष्ट्रीय अध्यक्ष अवधूत म्हमाणे यांनी केले.

अखिल भारतीय साने गुरूजी जिल्हा कथेमालेतर्फे 52 व्या अधिवेशनास प्रारंभ झाला आहे. राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये शनिवारी याचे माजी आमदार गंगाधर पाटणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

कार्यक्रमाची सुरूवात ग्रंथ दिंडी आणि शोभायात्रेने झाली. यामध्ये सुमारे 200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. बिंदू चौकातून सुरू झालेल्या शोभायात्रेची सांगता ते राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास अध्यक्ष जिनरत्न रोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दसरा चौकात झाली. यानंतर गायक सोमनाथ परब यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगान सादर केले.

दरम्यान, महिलांचे प्रश्न या चर्चासत्रामध्ये सानेगुरूजींच्या सामाजिक कार्याविषयी चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर त्यांच्या कार्याची दखल घेत स्त्राr शिक्षणाच्या पुरस्कर्त्या जनक सावित्रीबाई फुले यांच्याविषयी ‘जय जय सावित्रीबाई फुले, स्त्राr शिक्षणाचे मंदिर केले खुले’ अशा काव्य पंक्तीतून पल्लवी कोरगांवकर, नेहा कानकेकर, सुचिता पडवळ यांनी सुर अवळला.

 माजी आमदार गंगाधर पाटणे, कथामालेचे राष्ट्रीय अध्यक्ष अवधूत म्हमाणे, अधिवेशनाचे आयोजक अध्यक्ष हसन देसाई, गणपतराव पाटील, पल्लवी कोरगांवकर, एम. एस. पाटोळे, मिरासाहेब मगदूम, वसंत पाटील, डॉ. जे. बी. बाररेस्कर यांच्या हस्ते संस्थेच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच सत्कार समारंभही पार पडला. यावेळी सुधाकर कांबळे, एकनाथ जाधव, जगन्नाथ कांदळकर, शशिकांत पाटील, मोहन देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. सायंकाळच्या सत्रात संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शितल ठोंबरे आणि तृप्ती तुटूंब यांनी केले. अनिल चव्हाण यांनी आभार मानले.