|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » महिलांचे सबलीकरण करण्यासाठी प्रयत्नशील

महिलांचे सबलीकरण करण्यासाठी प्रयत्नशील 

वार्ताहर / वंदूर

ग्रामीण भागातील महिलांसाठी काय केले पाहिजे हे विचारात घेवून गांढूळ खत            प्रकल्प सुरु करीत आहोत. महिलांच्यामधूनच आपण प्रेरणा घेत आहोत. महिला ही कुटूंबाचा कणा आहे. त्या पतीच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असतात. गांढूळ खतामधनून चांगले पैसे मिळू शकतात. महिलांच्या उन्नत्तीसाठी हा प्रकल्प फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन जिजाऊ महिला संघटनेच्या कार्याध्यक्षा             सौ. नवोदिता घाटगे यांनी केले.

करनूर ता. कागल येथील तानाजी कुंभार यांच्या प्रांगणात राजे विक्रमसिंहजी घाटगे फौंडेशन, राजमाता जिजाऊ महिला समिती, छ. शाहू सहकारी साखर कारखाना व शाहू कृषी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने गांढूळ खत प्रकल्प शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी करणसिंह घाटगे होते.

यावेळी सौ. नवोदिता घाटगे म्हणाले, या गांढूळ प्रकल्पातून तयार झालेले खत शाहू कृषी संघ खरेदी करेल. यामुळे महिलांना आर्थिक लाभ होईल. ग्रामीण महिला सक्षम व सुरक्षित राहिली पाहिजे. या प्रकल्पासाठी जास्तीत जास्त महिलांनी पुढकार घ्यावा, असे सांगितले. 

समरजितसिंह घाटगे म्हणाले, महिलांच्या सबलीकरणासाठी आपण कागल तालुका व गडहिंग्लज परिसरात गावोगावी जावून महिलांचे प्रबोधन केले आहे. आम्ही महिला सबलीकरणासाठी प्रयत्न करीत आहोत. निवडणुकांच्या तोंडावर पंढरपूर, तुळजापूरला महिलांना पाठवून त्यांचे सबलीकरण होणार नाही, असा टोला समरजितसिंह घाटगे यांनी लगावला. महिलांना त्यांच्या पायावर उभे राहण्याची संधी देत आहोत. गांढूळ खताच्या प्रकल्पासाठी राजे बँकेकडून अर्थसहाय्य होणार आहे. या प्रकल्पातून महिलांना महिन्याला 5 हजार रुपये फायदा मिळेल. तर सरकारकडून या प्रकल्पासाठी 11500 रुपये सबसिडी मिळणार आहे. यासंदर्भात शाहू ग्रुपतर्फे महिलांना प्रशिक्षण देणार आहोत. हे येणारे पैसे महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. हा पहिलाच प्रयोग महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही राबवत आहोत. आण्णासाहेब पाटील महामंडळ अर्थ सहाय्य योजनेतून व्यवसाय सुरु करता येईल याचाही लाभ घ्यावा. आरोग्याच्या दृष्टीने महिला पूर्ण कुटूंबाची काळजी घेते. पण स्वतःची काळजी घेत नाही. कॅन्सरबाबत स्पष्ट बोलून राजे फौंडेशनमधून यावरती उपचार केले जातील. 2 फेब्रुवारी रोजी पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीतल कामगारांसाठी आरोग्य शिबीर घेत आहोत. राजकीय नेत्यांपुढे हात पसरायचे नाही. महिलांनी सक्षम बनायचे.

यावेळी समरजितसिंह घाटगे व सौ. नवोदिता घाटगे यांच्या हस्ते सौ. प्रभावती कृष्णात चव्हाण, सौ. रुपाली शरद चव्हाण यांच्या गांढूळ खत प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी ऊस विकास अधिकारी के. बी. पाटील यांनी गांढूळ खत प्रकल्पा संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी सौ. पल्लवी करणसिंह घाटगे, जयसिंग कांबळे यांनीही मनोगत व्यक्त पेले. स्वागत ग्रा. पं. सदस्या पूनम धनगर यांनी केले.              प्रास्ताविक के. बी. पाटी यांनी पेले. सूत्रसंचालन राजेंद्र मालूमल यांनी केलो. कार्यक्रमास तानाजी कुंभार, विक्रमसिंह घाटगे-वंदूरकर, ग्रा. पं. सदस्य लक्ष्मण भंडारे, गणपती चौगुले, बाळासो चौगुले, आनंदराव पाटील, सौ. विमल चौगुले, सौ. आक्काताई कुंभार, सौ. संगिता पाटील, सुनिता घाटगे यांच्यासह करनूर, वंदूर, व्हन्नूर परिसरातील महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. आभार सौ. विजया निंबाळकर यांनी मानले.