|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » आई हीच मुलगीची खरी मैत्रीण असते

आई हीच मुलगीची खरी मैत्रीण असते 

 

प्रतिनिधी/ कुरूंदवाड

मुलींच्या जीवनात आईचे स्थान खूप महत्त्वाचे असते. कारण आई हीच मुलीची खरी मैत्रीण असते, असे मत कुरुंदवाडच्या सुप्रसिद्ध धन्वंतरी डॉ. सौ. आयेशा  हुक्कीरे यांनी व्यक्त केले. लालबहादूर विद्यालयात संपन्न झालेल्या पालक-माता उद्बोधन वर्गाचे उद्घाटन करतांना व्यक्त केले.

कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील लालबहादूर माध्यमिक व उच्च माध्यमिक  विद्यालयात विद्यार्थिनींच्या माता-पालकांसाठी किशोरवयीन मुलींच्या समस्या व त्यावरील उपाययोजना या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हुक्कीरे म्हणाल्या, वयाच्या 16 व्या वर्षापर्यंत मासिक पाळी सुरु न झाल्यास डॉक्टरना भेटावे. आजकालच्या मुक्त जीवनशैलीमुळे मुला-मुलींना दिल्या जाणाऱया अमर्याद स्वातंत्र्यामुळे हातात असणाऱया मोबाईल इंटरनेटद्वारे लहान वयातच लैंगिकतेबद्दल आकर्षण वाटू लागते. याचा विपरित परिणाम होत असतो. त्यामुळे भुलभुलैय्याला न भूलता शालेय जीवनाचा आनंद घ्यावा.

दीपप्रज्वलनाचे डॉ. आयेशा हुक्कीरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. स्वागत आणि प्रास्ताविक सौ वाय. एम. मालुर यांनी केले.

मुख्याध्यापक पिंपळे, पर्यवेक्षक राजमाने, बाळासाहेब शहापूरे, इंग्लिश मिडीयम प्राचार्या कविता बस्तावाडे, सौ. भारती गायकवाड, सौ. करिश्मा आरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. परिसरातील पालक-माता मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन व्ही. आर. नाईक यांनी केले. आभार प्रा. एम. व्ही. पाटील यांनी मानले.