|Wednesday, February 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » लक्झरी-ट्रक धडकेत एक ठार

लक्झरी-ट्रक धडकेत एक ठार 

कासार्डेत पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात : अन्य दोघे गंभीर

वार्ताहर / तळेरे:

मुंबईगोवा राष्ट्रीय महामार्गावर कासार्डे जांभुळवाडी येथे सोमवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास गोव्याच्या दिशेने जाणाऱया आत्माराम ट्रव्हल्स बसने एका ट्रकला मागाहून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात बसचा चालक जागीच ठार झाला. बसचा क्लीनर आणि ट्रक चालक गंभीर जखमी आहेत. बसच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. दोन्ही वाहने गोव्याच्या दिशेने जात होती. दाट धुक्मयामुळे हा अपघात झाल्याचे समजते.

अपघातात बसचा चालक मंदार तटकरी (वय 25, रा. चिपळूण) जागीच ठार झाला. तर त्याच्यासोबत असलेले क्लीनर संजय ज्ञानोबा धोंगडे (वय 32, रा. लातूर) यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. ट्रक चालक दिलीप आंबर्डेकर (वय 54, रा. उत्तडे, रत्नागिरी) यांच्या उजव्या पायाला आणि डोक्मयाला मार लागल्याने ते गंभीर जखमी आहेत. बसच्या केबिनमध्ये अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता.

पुण्याहून गोव्याकडे निघालेली बस (एम. एच. 14 / जी. यू. 8868) कासार्डे प्राथमिक शाळेजवळ आली असता पुढे सिमेंट भरून रत्नागिरीहून वेंगुर्ल्याला (एम. एच. 12) . यू. 4534 क्रमांकाच्या ट्रकला मागाहून वेगाने धडकली. धुके असल्याने मालवाहू सिमेंटने भरलेला ट्रक हळूहळू गोव्याच्या दिशेने चालला होता. तर बसचा वेग जास्त असल्याने चालकाला नियंत्रण राखता आले नाही. बसचा चालक जागीच ठार झाला. चालकासह क्लीनर केबीनमध्येच अडकून पडले होते. अपघातानंतर बसचा दरवाजा चेपला गेल्याने प्रवासीही आत अडकले होते. अखेर बसची खिडकी फोडून शिडीद्वारे प्रवाशांना स्थानिक ग्रामस्थांनी बाहेर काढले. चालक आणि क्लीनर यांनाही अथक परिश्रमाने बाहेर काढण्यात आले.

बस चालक, क्लिनर आणि प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी भाऊ शेटये, आण्णा खाडये, प्रसाद जाधव, रुपेश कानसे, शिवाजी डोईफोडे, पप्या केसरकर, शुभम खटावकर, तेजस भांबुरे यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. गंभीर जखमी क्लिनर आणि ट्रक चालकास तात्काळ कासार्डे आणि वैभववाडी येथील 108 नंबरच्या रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातामध्ये सुदैवाने प्रवाशांना इजा झाली नाही.

कासार्डे पोलीस दूरक्षेत्राचे सहायक पोलीस उपनिरीक्षक एन. एस. खाडये यांनी अपघातानंतर विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली.

Related posts: