|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » व्हॅस्कॉन, मनीष कन्स्ट्रक्शनकडून सिट्रॉन प्रकल्पाची घोषणा

व्हॅस्कॉन, मनीष कन्स्ट्रक्शनकडून सिट्रॉन प्रकल्पाची घोषणा 

प्रतिनिधी/ पुणे

व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि. आणि मनीषा कन्स्ट्रक्शन्स या पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रातील दोन नामवंत व विश्वासार्ह कंपन्यांनी वाघोली येथे होणाऱया त्यांच्या सिट्रॉन या गृहप्रकल्पाची घोषणा केली आहे. व्हॅस्कॉन व मनीषा कन्स्ट्रक्शन्स या दोन्ही कंपन्या ‘सिट्रॉन’च्या विकास व्यवस्थापनात संयुक्तरित्या सहभागी असणार असून त्यातील सदनिकांच्या नावनोंदणीचे कामकाज 18 जानेवारीपासून सुरू केले आहे.

‘सिट्रॉन’च्या फेज-2 मध्ये दोन टॉवर्समध्ये मिळून 258 सदनिका असतील. बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असणाऱया 1 व 2 बीएचके स्वरुपाच्या या सदनिकांमधील वापरता येण्याजोगे क्षेत्रफळ अनुक्रमे 470 चौरस फूट व 656 चौरस फूट असणार आहे. 1 बीएचके सदनिकेची सर्व कर व शुल्कांसहीत किंमत 30.5 लाख आणि 2 बीएचके सदनिकेची किंमत 42.30 लाख रुपये असेल. वातानुकूलित क्लब हाऊस, अत्याधुनिक जिम्नॅशियम, स्विमिंग पूल, मुलांसाठी खेळण्याची जागा, पार्टी लॉन, स्पोर्ट्स फॅसिलिटी आणि बहुउद्देशीय हॉल अशा काही उत्तमोत्तम सुविधा या प्रकल्पात उपलब्ध असतील.

नव्या प्रकल्पाविषयी माहिती देताना ‘मनीषा कन्स्ट्रक्शन्स’चे संचालक अभिषेक खिंवसरा म्हणाले, पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये मनीषा कन्स्ट्रक्शन्स हे नाव गेल्या पाच दशकांहून अधिक काळ दबदबा राखून आहे. पुण्यात आमच्या कंपनीने अनेक वैशिष्टय़पूर्ण बांधकामे केली आहेत. व्हॅस्कॉन इंजिनिअर्सशी आमचा सहयोग हाही पूर्वीपासूनचा आहे. सिट्रॉन प्रकल्पाच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा एकत्र आलो आहोत आणि ग्राहकांना उत्कृष्ट सदनिका देण्यास कटिबद्ध आहोत.

व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ वासुदेवन म्हणाले, ‘सिट्रॉन प्रकल्पा’च्या दुसऱया फेजमध्ये मनीषा कन्स्ट्रक्शनशी सहयोग करताना आम्हाला आनंद होत आहे. यापूर्वी सिट्रॉनच्या पहिल्या फेजला ग्राहकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला होता.