|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वॉर्ड पुनर्रचना-आरक्षण सुनावणीला प्रारंभ

वॉर्ड पुनर्रचना-आरक्षण सुनावणीला प्रारंभ 

बेळगाव

महापालिका वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षणाबाबतच्या उच्च न्यायालयातील  याचिकेच्या सुनावणीला अखेर प्रारंभ झाला आहे. नगरविकास खात्याने सोमवारपर्यंत हरकत दाखल केली नाही. मात्र वॉर्ड पुनर्रचना व आरक्षण चुकीचे झाले असल्याचे वादीच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत आता 29 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.

धारवाड खंडपीठाच्या उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरक्षण व वॉर्ड पुनर्रचनेच्या याचिकेची सुनावणी लांबणीवर पडत चालली आहे. बेंगळूर उच्च न्यायालयाने मंगळूरसह 13 नगरपालिकांचे वॉर्ड आरक्षण रद्द करून दि. 28 पर्यंत नक्याने आरक्षण जाहीर करण्याचा आदेश दिला आहे. तसेच निवडणुका वेळेत घेण्याची गरज असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले होते. मात्र धारवाड उच्च न्यायालयातील सुनावणी होत नसल्याने निवडणुकीबाबत पेच निर्माण झाला आहे.  सोमवारी दुपारनंतर याचिकेबाबतची सुनावणी झाली. यावेळी निवडणूक आयोगाच्यावतीने ऍड. विद्यावती यांनी युक्तीवाद केला. निवडणुकीची तयारी झाली असल्याने निवडणुका घेण्याची परवानगी देण्याची विनंती केली.

वॉर्ड पुनर्रचना करताना नियम डावलण्यात आले आहे. तसेच आरक्षणदेखील रोटेशनप्रमाणे नसल्याची माहिती देऊन वादीच्यावतीने ऍड. सचिन मगदूम व ऍड. शिवराम बल्लोळी यांनी युक्तीवाद केला. त्याचप्रमाणे निवडणुका घेण्याच्यादृष्टीने तयारी केली आहे. पण वॉर्ड पुनर्रचनेत बऱयाच त्रुटी असल्याचे सांगण्यात आले. यावेळी हुबळी-धारवाडचे वकील उपस्थित होते. सदर सुनावणी मंगळवार दि. 29 रोजी दुपारी अडीच वाजता घेण्याचे निश्चित करण्यात आले. यामुळे आता पुढील सुनावणी दि. 29 रोजी होणार असून यावेळी अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्मयता असल्याचे सांगण्यात आले.