|Friday, April 19, 2019
You are here: Home » leadingnews » गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा :धनंजय मुंडे

गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा :धनंजय मुंडे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

गेल्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक करण्यात आल्याची माहिती असल्यानेच भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आल्याचा दावा एका सायबर तज्ञाने केला आहे. या खळबळजनक दाव्यामुळे देशातले राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणाची चौकशी रॉ किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून केली जावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केली.

 

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ईव्हीएम हॅक करुन विजय मिळवल्याचा दावा अमेरिकन सायबर तज्ञाने केला. या संपूर्ण प्रकरणाची कल्पना असल्यानेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आल्याचा दावाही त्याने केला. याबद्दल धनंजय मुंडेंनी आश्चर्य व्यक्त केले. ’गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱयांनी नेहमीच त्यांच्या मृत्यूबद्दल प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू हा अपघात होता की अपघात, याची चौकशी व्हायला हवी,’ अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली. या संदर्भात त्यांनी एक ट्वटि केले आहे. ’गोपीनाथराव मुंडे यांची हत्या झाल्याचा दावा एका सायबर तज्ञाने केला आहे. या दाव्याची रॉ किंवा सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी झाली पाहिजे. कारण ही माहिती एका लोकनेत्याशी संबंधित आहे,’ असे मुंडेंनी ट्वटिमध्ये म्हटले आहे.

 

Related posts: