|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » राज्य सरकार बरखास्त करा , ओबीसी नेत्यांची राज्यपालांकडे मागणी

राज्य सरकार बरखास्त करा , ओबीसी नेत्यांची राज्यपालांकडे मागणी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्य सरकार बरखास्त करा, अशी मागणी ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याकडे केली आहे. प्रकाश शेंडगे यांच्यासह इतर ओबीसी नेत्यांनी आज राजभवनावर राज्यपालांची भेट घेतली.

स्वातंर्त्र्यानंतर राज्यात पहिल्यांदाच राज्य सरकारने आरक्षणाचा खेळखंडोबा मांडला आहे. सर्व लहान जाती अस्वस्थ आहेत, त्यांच्यात असुरक्षिततेची भावना आहे. या सरकारने मराठा समाजाला वेगळय़ा प्रवर्गात आरक्षण देण्याचे मान्य केले होते. परंतु कायदा करताना त्यांना एसईबीसीमध्ये म्हणजेच ओबीसीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच राज्यात आधीच 50 हजार नोकऱयांचा बॅकलॉग आहे. तरीही सरकार मेगाभरती करत आहे. आधी बॅकलॉग भरा मग मेगाभरती करा,असे प्रकाश शेंडगे म्हणाले. न्यायालयातही या सरकारने ओबीसी आरक्षणाविरोधत भूमिका घेतली आहे. त्यांनी न्यायालयात योग्यरित्या बाजू मांडली नाही. या सरकारने ओबीसी समाजाचा विश्वासघात केला आहे. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे हे सरकार बरखास्त करावे, अशी मागणी राज्यपालांकडे केल्याचे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले.