|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरक्षा व्यवस्थेत वाढ

दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरक्षा व्यवस्थेत वाढ 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाची राजधानी दिल्लीत मोठय़ा प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासाठी दिल्लीला 28 सेक्टरमध्ये विभागले असून त्याची जबाबदारी वरि÷ पोलीस अधिकाऱयांना दिली आहे.

दिल्लीत काही घातपात घडू नये यासाठी दिल्ली पोलिसांसोबत सुरक्षा जवान दिवस-रात्र काम करत आहेत. या सुरक्षा व्यवस्थेसाठी 50 हजार पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. विजय चौकापासून ते लाल किल्ल्यापर्यंत 600 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीमध्ये सर्व प्रमुख बाजार, रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन, एअरपोर्ट, बस स्थानके, ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याचबरोबर, काही महत्वपूर्ण स्थळांची जबाबदारी लष्कराने घेतली आहे. तसेच, संवेदनशील ठिकाणी गस्त वाढवण्यात आली असून ठिकठिकाणी नाकाबंदी करून तपासणी केली जात आहे.